Kasba Bypoll Election: गैरहजर राहून शैलेश टिळकांनी भाजपला दिला मेसेज, हेमंत रासने म्हणतात..

उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस
Kasba Bypoll Election
Kasba Bypoll Electionesakal
Updated on

सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकर पार पडणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.

Kasba Bypoll Election
Pune Bypoll Election: पुणे पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठ वक्तव्य

दरम्यान, भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हेमंत रासने निघाले. त्यांनी कसबा ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत पायी रॅली काढली या रॅलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थितीत होते.

Kasba Bypoll Election
Pune : पुणे पोटनिवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला धक्का; मोठा नेता भाजपच्या वाटेवर

मात्र शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची या रॅलीकडे पाठ फिरवली आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

हेमंत रासने यांच्या हस्ते कसबा गणपतीची आरती करण्यात आली मात्र टिळक कुटुंबीयांचे कोणीच सदस्य यावेळी नसल्यामुळे टिळक कुटुंबीयांच्यात नाराजी आहे हे उघडपणे दिसून आले त्यामुळे आता टिळक काय भुमिका असणार हे पाहवं लागेल.

हेमंत रासने यांची प्रतिक्रिया

दिली ते म्हणाले, गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून भाजपचं काम करीत आहे. आमदारकीची संधी आत्ता मिळाली आहे.

गेल्या वेळेस उमेदवारी मागितली होती परंतु मुक्ता टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिल्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.

भाजपमध्ये नाराजीची भाषा चालत नाही. हा शिस्तबद्ध पक्ष आहे. विरोधात कोणीही असो कसाही प्रचार करो, भाजप आणि मित्र पक्षांच्या बाळावर विजय मिळवणारच .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.