चुरशीच्या लढतीत सिद्धूंची दमछाक

अकाली दलाच्या आव्हानामुळे मतदारसंघातच ‘लॉक’
punjab election
punjab electionsakal
Updated on

अमृतसर : पंजाबमधील सर्वांत चुरशीची लढत अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघात असून पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापुढे अकाली दलाचे उमेदवार बिक्रमसिंग मजीठिया यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे सिद्धू मतदारसंघातच ‘लॉक’ झाले असून त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

punjab election
मुख्यमंत्री म्हणतात, 'राजीव गांधींच तुमचे वडील आहेत याचा पुरावा काय?'

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून आपले नाव घोषित होईल अशी अपेक्षा सिद्धू यांना होती. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या ब्रिकमसिंग यांच्याशी त्यांची गाठ पडली आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघात सिद्धू विद्यमान आमदार आहेत. बिक्रमसिंग या पूर्वी मजिठा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तेथे आता त्यांची पत्नी गुरमित कौर निवडणूक लढवीत आहेत. अकाली दल- भाजप युतीमधून अमृतसरमध्ये दोन वेळा खासदार झालेल्या सिद्धू आणि बिक्रमसिंग यांच्यात एकेकाळी मैत्री होती. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर सिद्धू यांनी बिक्रमसिंग यांना अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले. ते स्वीकारून मजीठिया आता त्यांच्यासमोर ठाकले आहेत. भाजपकडून निवृत्त आयएएस अधिकारी जगमोहनसिंग राजू, आपकडून जीवनज्योत कौरही रिंगणात आहेत.

punjab election
देशात 'दोन अपत्ये' धोरणासाठी कायदा करा; भाजप नेत्याची लोकसभेत मागणी

बिक्रमसिंग यांची बहिण हरसिमरन कौर या खासदार असून अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांची पत्नी आहे. अकाली दलातील एक बडे व्यक्तिमत्त्व म्हणून बिक्रमसिंग यांची ओळख आहे. अमृतसर महापालिका काँग्रेसच्या ताब्यात असली तरी, त्यांनी अमृतसर पूर्वमधील चार नगरसेवकांना फोडून त्यांचा अकाली दलात प्रवेश करून घेतला आहे. मतदारसंघात चक्कर मारली असता, फ्लेक्स, निवडणूक कार्यालये, रिक्षांवर अकाली दलाचे झेंडे मोठ्या संख्येने दिसतात. वातावरण निर्मितीमध्ये बिक्रमसिंग यांनी आघाडी घेतली आहे.

एक लाख ७५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात अकाली दलाचा मतदार येथे मोठ्या संख्येने नसला तरी, निवडणूक तंत्रात वाकबगार असलेल्या बिक्रमसिंग यांच्यामुळे येथील निवडणूक रंगतदार झाली आहे. भाजपची आणि आपकडून होणारी मतविभागणी सिद्धू यांना अडचणीत आणू शकते, असे सध्याचे चित्र आहे.

punjab election
IPL Auction 2022 : सामना टाय सुपर ओव्हर; बोली समान लावली तर काय?

सिद्धूंपेक्षा चन्नींच्याच दौऱ्यांना मागणी

प्रदेशाध्यक्ष असलेले सिद्धू देशात वक्ते म्हणून लोकप्रिय आहेत. पण, चरणजितसिंह चन्नी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसने जाहीर केले. तेव्हापासून सिद्धू यांच्यापेक्षा चन्नी यांच्या दौऱ्यांसाठी काँग्रेस उमेदवारांकडून पक्षाकडे मागणी वाढली आहे. त्यातच सिद्धू गेल्या पंधरा दिवसांत दोन वेळा जम्मूमध्ये वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेले होते. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना, देवदर्शनावरून मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.