पाच राज्यांत काँग्रेसचा झालेला पराभव हा पक्षाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय.
पाच राज्यांत काँग्रेसचा (Congress Party) झालेला पराभव हा पक्षाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. पंजाबसारखं राज्यही 'आप'नं काँग्रेसच्या हातून काढून घेतलं असून गोव्यातही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळं आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. यात पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांचाही समावेश होता.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 5 राज्यांतील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं आकलन करण्यासाठी आणि निवडणूक पराभवानंतर संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी 5 वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केलीय. यामध्ये जयराम रमेश यांच्याकडं मणिपूर, अजय माकन यांना पंजाबमधील परिस्थितीचं आकलन करण्याचं काम सोपवण्यात आलंय. तर, राज्यसभा खासदार रजनी पाटील (Rajni Patil) यांना गोव्यातील परिस्थितीचं आकलन करण्यास सांगितलंय. तसेच काँग्रेस नेते जितेंद्र सिंह उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं मूल्यांकन करतील आणि बदल सुचवतील, तर अविनाश पांडे यांना उत्तराखंडमध्ये असंच काम करण्यास सांगितलंय.
काँग्रेसनं बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, काँग्रेस अध्यक्षांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं आकलन करण्यासाठी नेत्यांची नियुक्ती केलीय. यात खासदार-आमदारांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या भाजपशासित राज्यांपैकी एकही राज्य जिंकण्यात काँग्रेसला अपयश आलंय, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं काँग्रेसचा पराभव करून सत्ता मिळवलीय. यापूर्वी 15 मार्च रोजी सोनिया गांधींनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर युनिटच्या प्रमुखांना राजीनामे देण्यास सांगितलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.