Telangana Assembly Election Results : "वाट पाहू.."CM शिंदेंच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमीवर क्लीन ड्राइव्ह सुरू, तेलंगणाचे पहिले कल हाती येताच दिली पहिली प्रतिक्रिया

Telangana Assembly Election 2023 Results LIVE: BRS is back in the race, with a 49-seat; will the BJP be the deciding factor?
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal
Updated on

Telangana Assembly Election Results : महाराष्ट्राचे शेजारील राज्य तेलंगणा येथील विधानसभा निवडणुकीचे पहिले कल हातात येत आहेत. या कलानुसार राज्यात सत्ताबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निकाल अजून स्पष्ट होऊ देत असं म्हणत सबुरीचा सल्ला दिला.

एकनाथ शिंदे हे चौत्य भूमीवर क्लीन ड्राईव्ह सुरू करण्यात आलं आहे. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी निवडणूक निकालांबाबत प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde
Telangana Results 2023 : तेलंगणामध्ये काँग्रेसने जिंकल्या ६४ जागा; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

तेलंगणामध्ये निवडणूक निकालाचे सुरूवातीचे कल हाती आले त्यावेळी काँग्रेस आघाडीवर होते. तर राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये भाजप पुन्हा मुसंडी मारताना दिसत आहे. मात्र काही वेळांनी छत्तीसगडमध्ये आघाडीवर असलेली काँग्रेस पिछाडीवर पडली आहे.

दरम्यान, मुंबईत क्लीन ड्राईव्ह सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्य भूमीला भेट दिली. यावेळी बोलाताना मुख्यमंत्री म्हणाले की, 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यावेळी अनुयायांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून सरकार, पालिका आणि बाबासाहेबांचे अनुयायी तयारी करत आहेत.'

मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमी कमिटी आणि पालिका प्रशासनासोबत बैठक झाल्याचे सांगितले. सगळा आढावा घेतला असून अनुयायांना सर्व सुविधा पुरवल्या जातील 6 डिसेंबरला कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले.

Eknath Shinde
Chhattisgarh Election result: छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

यानंतर पत्रकारांनी त्यांना मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड येथे झालेल्या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारला. यातील काही राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील प्रचार केला होता.

याबाबत ते म्हणाले की, महायुतीला अनुकूल निकाल येतील थोडावेळ वाट पाहू चित्र स्पष्ट होईल. लगेचच अनुमान काढता येणार नाही महायुतीला अनुकूल असाच निकाल येईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.