Telangana Assembly Election Results : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेस मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. त्यामुळे याठिकाणी आपण नक्कीच विजय मिळवू असा विश्वास काँग्रेसला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार देखील हैदराबादला पोहोचले आहेत. ते हॉटेल ताजकृष्णा येथून मतमोजणी प्रक्रियावर लक्ष ठेवणार आहेत.
निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसने ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. यामध्ये विजयी उमेदवारांची नावं देऊन त्यांचं अभिनंदन देखील केलं आहे. रेवंत रेड्डी, भट्टी विक्रमार्का, सीथाक्का, मधुयाश्की, मैनामपल्ली हनुमंथा राव, फिरोज खान, कोंडा सुरेखा, जगारेड्डी यांच्यासह अनेक उमेदवारांची नावं या बॅनर्समध्ये छापण्यात आली आहेत.
निवडणुकीचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसने या कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. बीआरएस मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. तर भाजप आणि एमआयएम यांचा सुपडा साफ होण्याची चिन्हं दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.