Telangana Election : तेलंगणामध्ये काँग्रेसचा 'एम फॅक्टर', 119 पैकी 46 जागांवर होणार थेट फायदा

Telangana Election 2023
Telangana Election 2023esakal
Updated on

Telangana Election 2023 : राजस्थान विधानसभेसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यानंतर तेलंगणा विधानसभेसाठी मतदान होईल. तेलंगणाची लोकसंख्या साधारण साडेतीन कोटी इतकी आहे.

तेलंगणामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या १३ टक्के इतकी आहे. राजकीय जाणकारांच्या आकलनानुसार राज्यातल्या ११९ जागांपैकी एक तृतीअंश जागांवर मुस्लिमांची मतं प्रभाव टाकतात. म्हणजे तेलंगणातील ४६ जागांवर मुस्लिम मतदारांचं मतदान निर्णायक ठरतं.

तेलंगणा निवडणुकीत उतरलेल्या पक्षांची मुख्य लढत 'बीआरएस'सोबत असली तरी काँग्रेस आणि भाजपने ज्या पद्धतीने राजकीय वातावरण केलं आहे, त्यावरुन इतर राज्यात आणि लोकसभा निवडणुकीतदेखील त्याचे परिणाम दिसून येतील.

भाजपने तेलंगणामध्ये जाहीरपणे मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण काढून घेण्याची घोषणा केली. तर काँग्रेसने एम फॅक्टरच्या माध्यमातून मोठी खेळी केल्याचं दिसून येतंय. राजकीय विश्लेषक सांगतात की, राज्यात निवडणुकीचा निकाल काहीही येवो परंतु एम फॅक्टरच्या अनुषंगाने देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत तेलंगण निवडणुकीचा प्रभाव पडेल.

Telangana Election 2023
मोठी बातमी! बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात CBI चौकशी सुरु असतानाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल..

ज्येष्ठ पत्रकार एन. सुदर्शन सांगतात, राज्यातल्या सगळ्या जागांचा अभ्यास केला तर हैदराबादच्या १० मतदारसंघात ४० टक्के मुस्लिम आहेत. त्यानंतर २० जागा अशा आहेत जिथे सरासरी २० टक्के मुस्लिम निर्णायक ठरतात. आणखी १६ मतदारसंघात १४ टक्के मुस्लिम मतदार आहेत आणि तेच हार-जित ठरवतात.

याशिवाय असे १० मतदारसंघ असे आहेत ज्यापैकी ७ जागांवर तर असदुद्दीन ओवैसी यांचा प्रभाव आहे. त्यामुळे तिथल्या जागा त्यांच्याकडे आहेत. ज्यामध्ये निजामाबाद, करीमनगर, नालागोंडा, महबूबनगर, रंगारेड्डी, हैदराबाद आणि मेंडक या मतदारसंघांचा समावेश आहे.

Telangana Election 2023
फॉरेक्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी RBIने प्रसिद्ध केली अलर्ट लिस्ट, चुकूनही 'या' प्लॅटफॉर्मचा वापर करु नका

तेलंगणातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय घडामोडींचे अभ्यासक एनडी राव हे म्हणतात, एकीकडे बीआरएसने मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आणि नवीन घोषणाही केल्या. मात्र दुसरीकडे काँग्रेसनेही मुस्लिमांना मेसेज देण्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा काढला. आम्हीच मुस्लिमांच्या बाजूने उभा आहोत, असा मेसेज देशभर काँग्रेसला द्यायचा आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा एम फॅक्टर फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. 'आज तक'ने यासंदर्भातील विस्तृत विश्लेषण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.