उल्हासनगरमध्ये दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आलीये. भाजपचे कुमार आयलानी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओमी कलानी यांचा ३० हजार मतांनी पराभव केलाय. कुमार आयलानी यांना तब्बल ८२ हजार २३१ मतं मिळाली आहेत. तर ओमी कलानी यांना ५१ हजार मतं मिळाली आहेत.
विधानसभेचं बिगुल वाजल्यापासून सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले. आपलाच आमदार निवडून यावा यासाठी सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत होते. उल्हासनगर हा कल्याण जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे कुमार आयलानी विरुद्ध राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे ओमी कलानी अशी लढत झाली.