Uttarakhand Election: रस्ता नसल्याच्या निषेधार्थ मतदार ‘नोटा’ वापरणार

अनेक वर्षांपासूनची जोड रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने चंपावत जिल्ह्यातील आम खडक या गावातील ग्रामस्थांनी ‘नोटा’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
nota option
nota optionSakal
Updated on

पिठोरगड : अनेक वर्षांपासूनची जोड रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने चंपावत जिल्ह्यातील आम खडक या गावातील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. (Uttarakhand Assembly Election)

आम खडक या गावासाठी दीड किलोमीटर लांबीचा जोड रस्ता निर्माण करून तो टनकपूर-चंपावत महामार्गाला जोडल्यास दळणवळण व्यवस्था सुधारेल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी २००७ मध्ये केलेली ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. या प्रस्तावित रस्त्याचा समावेश जिल्हा नियोजन आराखड्यात असला तरी त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. हा जोड रस्ता नसल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणी येत असून गावातील ६५ टक्के लोकांनी याच त्रासाला कंटाळून स्थलांतरही केले आहे. या छोट्या गावात आधी ७५ कुटुंब राहत होती, आता केवळ २५ उरली आहेत.

nota option
लोकशाही ही 'वैयक्तिक' नियमानुसार नाही तर...: राज्यपालांनी ममतांना खडसावले

‘दर निवडणुकीच्या वेळी आम्हाला नेत्यांकडून रस्त्याबाबत आश्‍वासन मिळते. मात्र, निवडणूक संपताच ते मागणीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ‘नोटा’ वापरण्याशिवाय आमच्यासमोर आता पर्याय उरला नाही,’ असे गावातील गंगादेवी यांनी सांगितले.

स्वातंत्र्य सैनिकांचे गाव असूनही...

आम खडक गावाने देशाला रामचंद्र चौराकोटी, बेनिराम चौराकोटी, बचिराम चौराकोटी आणि पद्मदत्त चौराकोटी असे चार स्वातंत्र्यसैनिक दिले होते. या चौघांनी महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात पुकारलेल्या ‘छोडो भारत’ चळवळीत सहभाग घेतला होता. या चौघांचा सार्थ अभिमान असलेल्या या गावात शिक्षण, बँक आणि वैद्यकीय सुविधांची मात्र वानवा आहे. विद्यार्थ्यांना शाळेसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते, तर किरकोळ आजारासाठीही २५ किलोमीटरवरील टनकपूर येथे जावे लागते. गावात विद्युत पुरवठा आहे, पण त्यात काही अल्प तांत्रिक बिघाड झाला तरी तंत्रज्ञ गावात येण्यासाठी काही महिने वाट पहावी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()