उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का; आजी-माजी मुख्यमंत्री पराभूत

उत्तराखंडमध्ये कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता
उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का; आजी-माजी मुख्यमंत्री पराभूत
Updated on

आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहे. देशातील पाचपैकी चार राज्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. यापैकी उत्तराखंड राज्याची विधानसभा निवडणुकही चांगलीच रंगली आहे. येथे 70 जागांसाठी मतदान झालं आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Election) कोणत्याच पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता. भाजपने नेतृत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) आणि 'आप'ने अजय कोठियाल यांना दिली होती. (Uttarakhand Election Results 2022)

दरम्यान, या दोन्ही दिग्गज नेत्यांनी निवडणुकीसाठी बाजी लावली आहे. या दोघांसाठीही विजय सोपा नव्हता. परिणीमी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी (Pushkar singh Dhami) आणि हरीश रावत हे दोघे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. दरम्यान, यामुळे दोघांचीही राजकीय कारकीर्द धोक्यात येणार का असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे पुष्कर सिंग धामी यांना ३३,११५ म्हणजे ४३.७५ टक्के इतके मतदान झाले असून हरीश रावत यांना २८.०४६ म्हणजेच ३३.२६ टक्के मतदान झाले आहे. 2017 मध्ये भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या, यावेळीही तो आकडा अजून मिळवता आलेला नाही. तसेच ही शेवटची निवडणूक लढवणार असल्याचे हरीश रावत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणुकीतील पराभव त्यांच्या राजकीय वाटचालीवर पूर्णविराम लागणार का?, अशी चर्चा सुरु आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का; आजी-माजी मुख्यमंत्री पराभूत
Manipur : भाजपची बहुमताच्या दिशेनं वाटचाल; 29 जागांवर आघाडी

चार महिन्यात तीनवेळा मुख्यमंत्री बदलणारे राज्य

उत्तराखंडची निर्मिती झाल्यानंतर तीरथ सिंह रावत तिथले पहिले शिक्षण मंत्री होते. त्यानंतर 2007 मध्ये त्यांना उत्तराखंड राज्याचे सरचिटणीस करण्यात आलं. 2012 मध्ये ते आमदार झाले आणि 2013 मध्ये त्यांच्याकडे राज्यातली भाजपची जबाबदारी सोपवण्यात आली. तीरथ सिंह रावत यांना एक लो-प्रोफाईल नेता म्हटलं जातं आणि ते गृह मंत्री अमित शाहांच्या जवळचे मानले जातं. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला उत्तराखंडमध्ये मोठं यश मिळालं. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसभेत भाजपला 57 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला फक्त 11 जागा जिंकता आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळूनही भाजपला उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी चार महिन्यात तीनवेळा मुख्यमंत्री बदलावे लागले होते. 4 वर्ष त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, पण पक्षांतर्गत नाराजीमुळे रावत यांच्याऐवजी तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केलं.

कोण आहेत पुष्कर सिंह धामी?

पुष्कर सिंह धामी हे सध्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. खटीमा (उधमसिंह नगर) मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले पुष्कर सिंह धामी राज्याचे 11वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म पिथौरागढमधल्या टुण्डीमध्ये झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना राजकारणाची ओढ होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर त्यांनी काम केलं. उत्तराखंडची निर्मिती केल्यानंतर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून 2002 पर्यंत काम पाहिले होते. उत्तराखंडमधील सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वयाच्या 45 व्या वर्षी राज्याचा कारभार हाती घेतला. त्यांना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नीकटवर्तीय म्हणून ओळखलं जातात. भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री असताना पुष्कर धामी त्यांचे ओएसडी होते. पुष्कर धामी यांनी आजवर कोणतंही मंत्रिपद सांभाळलेलं नाही.

उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का; आजी-माजी मुख्यमंत्री पराभूत
Goa Election Results LIVE |गोव्यात भाजपच्या पाठिशी अपक्षांसह मगोप, मॅजिक फिगर गाठली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.