वैभववाडी: वाभवे वैभववाडी (Vaibhavwadi)नगराध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईणकर आणि उपनगराध्यक्षपदी संजय सावंत यांची निवड झाली. निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यानी शहरातुन ढोलताशांच्या गजरात आणि फटक्यांची आतषबाजी करीत मिरवणुक काढली. वाभवे वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणुक आज (ता.१४) झाली.
नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडुन (BJP) प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेवक नेहा माईणकर यांची नामनिर्देशनपत्र दाखल केले होते तर शिवसेनेकडुन प्रभाग क्रमांक सतरा मधुन निवडुन आलेल्या सानिका सुनील रावराणे यांनी अर्ज दाखल केला होता.आजच्या सभेत मतदान घेण्यात आले.यावेळी माईणकर यांना १० तर सौ.रावराणे यांना पाच मते मिळाली.दोन अपक्ष नगरसेवक तटस्थ राहीले.उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडुन संजय सावंत तर शिवसेनेकडुन रंजित तावडे यांनी अर्ज दाखल केले होते. सावंत यांना १० तर तावडे यांना पाच मते मिळाली. (Vaibhavwadi NagarPanchayat Election 2022)
नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी निवड होताच भाजपाच्या कार्यकर्त्यानी नगरपंचायतीबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली.यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली.भारत माता कि जय,नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणु सोडला.त्यानंतर दत्तमंदीर ते भाजपा कार्यालय विजयी मिरवणुक काढण्यात आली.
नगराध्यक्षपदी निवड झालेल्या कु.माईणकर आणि उपनगराध्यक्षपदी निवड झालेले श्री.सावंत यांचे तालुकाध्यक्ष नासीर काझी,भालचंद्र साठे,अरविंद रावराणे,जयेंद्र रावराणे, सज्जन रावराणे,दिगबंर मांजरेकर,बाळा हरयाण,हर्षदा हरयाण,स्नेहलता चोरगे,शुभांगी पवार,यासह सर्व नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नेहा माईणकर म्हणाल्या पक्षाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला साजेसे काम आपण येत्या काळात करणार आहे.सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेवुन काम केले जाईल.शहरातील अधिकाधिक कामे प्राधान्याने होतील याकडे लक्ष दिले जाईल.यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. उपनगराध्यक्ष संजय सावंत म्हणाले शहरातील जे प्रलबिंत प्रश्न आहेत.ते आमदार राणेंच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार आहोत.शहराच्या सर्वागीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे.
अपक्षांनी शिवसेनेची साथ सोडली
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीमध्ये दोन अपक्ष उमेद्वार निवडुन आले आहेत.यामध्ये अक्षता जैतापकर आणि सुभाष रावराणे यांचा समावेश आहे.हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेला साथ देतील अशी अपेक्षा होती.यातील श्री.रावराणे हे शहरप्रमुख आणि नगरसेवक प्रदीप रावराणे यांचे काका आहेत.त्यामुळे ते शिवसेनेच्या बाजुने उभे राहतील अशी शक्यता होती.परंतु दोनही अपक्ष मतदानाच्यावेळी तटस्थ राहीले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.