मणिपूरमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण? 'या' तिघांत मोठी स्पर्धा

Manipur Assembly Election 2022
Manipur Assembly Election 2022esakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री पदावरुन भाजपमध्ये वाद सुरु असल्याचं कळतंय.

Manipur Assembly Election 2022 : मणिपूर विधानसभेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं 60 पैकी 32 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं; पण मुख्यमंत्री पदावरुन सध्या वाद सुरु असल्याचं कळतंय. मणिपूरचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन भाजपमध्ये (BJP) गदारोळ सुरुय. मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं एन. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांना अधिकृतपणे 'मुख्यमंत्री' म्हणून घोषित केलं नाही, त्यामुळं वाद रंगलाय.

थोंगम बिस्वजित सिंह दुसरे दावेदार

मणिपूरमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पक्षांतर्गत वाद सुरूय, त्यामुळं निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणालाही घोषित केलं नव्हतं. एन. बीरेन सिंह यांनी मणिपूरमध्ये 5 वर्षे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी सरकारचं नेतृत्व केलंय. परंतु, त्यांना पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करावा लागतोय. थोंगम बिस्वजित सिंह (Thongam Biswajit Singh) हे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक आहेत.

Manipur Assembly Election 2022
5 राज्यांच्या निकालांचा थेट राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर परिणाम!

एन. बीरेन सिंह यांच्या आधी थोंगम भाजपमध्ये दाखल झाले होते. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थोंगम बिस्वजित सिंह यांना 2017 मध्ये वाटलं होतं की, वरिष्ठ असल्यानं त्यांना मणिपूरचं मुख्यमंत्री केलं जाईल. पण, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं एन. बिरेन सिंह यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. या निर्णयामुळं थोंगम बिस्वजित सिंह संतप्त झाले होते. दरम्यान, थोंगम यांना मणिपूर सरकारमधील महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली होती. थोंगम बिस्वजित सिंह यांनी एन बीरेन सिंग यांच्यासमवेत पाच वर्षांत अनेकवेळा दिल्लीला भेट देऊन त्यांच्या समस्यांबाबत त्यांचं म्हणणं केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवलं होतं, पण काही उपयोग झाला नाही.

Manipur Assembly Election 2022
पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच 'आप'चे 13 डॉक्टर झाले 'आमदार'

गोविंददास कोन्थौजम तिसरे दावेदार

मणिपूरच्या पुढील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये गोविंददास कोन्थौजम (Govindas Konthoujam) हे आणखी एक नाव आहे. ते काँग्रेसचे माजी राज्य प्रमुख होते. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कोन्थौजम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. गोविंददास 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मणिपूरची बिष्णुपूर जागा जिंकून विधानसभेत पोहोचले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()