Explained: तावडेंच्या चाणक्यनीतीमध्ये CM शिंदे चेकमेट, सेनेचे 'ठाणे' भाजपला महत्वाचे का?

Thane politics news
Thane politics news
Updated on

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची महाराष्ट्रात युती आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदरांसह भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. यामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळाले.

कधीकाळी भाजपशी युती तोडा नाहीतर राजीनामा देतो, अशी जाहीर घोषणा करणारे एकनाथ शिंदे आज भाजप सोबत संसार थाटत आहे. मात्र या संसारात जागांच्या वापटपावरुन वाद सुरु आहेत. पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, नेते नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वापरलेली निती आता भाजप शिंदे गटासोबत वापरत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Thane politics news
Supriya Sule: "पत्रकारांची ताडोबात ट्रीप कधी काढायची?" सुप्रिया सुळेंनी शेयर केली 'ती' कविता, भाजपचे टोचले कान

शिंदे गट भाजपमध्ये वाद सुरु झाला तो खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ कल्याणपासून. या मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. स्थानिक भाजप नेत्यांनी डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले होते. महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपनेते रवींद्र चव्हाण यांनी मतदारसंघात लक्ष देणारा खासदार हवा, आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपला द्या, अशी मागणी केली होती. यानंतर वाद वाढला श्रीकांत शिंदेंनी तर राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र भाजपची क्रोनोलॉजी जरा वेगळी होती. भाजपने चाणक्यानितीचा वापर केला. कल्याण मतदारसंघाची मागणी करणं भाजपचा पॉलिटीकल गेम होता. कारण भाजपला त्यांचा जूना मतदारसंघ 'ठाणे' हवा होता. आता भाजप त्यांच्या खेळीत यशस्वी झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

ठाणे भाजपला तर कल्याण शिंदेंना -

कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाने लढवावी अन्‌ ठाणे भाजपला द्यावी, असा प्रस्ताव मान्य झाल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र या प्रस्तावामुळे ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून शिवसेना वाढवली. आनंद दिघे हे देखील ठाण्यातून शिवसेना चालवायचे त्यामुळे पुत्र प्रेमासाठी एकनाथ शिंदे 'स्वाभिमानी' ठाणे भाजपला देणार का?, याबाबात अजूनही शिवसैनिकांना तरी विश्वास नाही.

ठाणे लोकसभेवर सध्या ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. राजन विचारे हे ठाकरे गटाचे खासदार आहेत. आनंद दिघे यांचे दोन हात एकनाथ शिंदे आणि राजन विचारे असं समीकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहित होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दोन गट पडले. त्यामुळे ठाणे भाजपला दिले नाही तर लोकसभेत एकनाथ शिंदेंची 'शिवसेना' विरुद्ध 'ठाकरे गट', अशी लढाई होऊ शकते. त्यामुळे शिंदे गट कल्याण आपल्याकडे ठेवत ठाणे भाजपला देण्यासाठी तयार होईल, असे राजकीय जाणकरांचे मत आहे.

कल्याण मतदारसंघाच्या मागणीपासून भाजपने ठाण्यासाठी फिल्डिंग लावली. भाजपने महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे मनसुबे आखले जात आहे. त्यामुळे आधी शिवसेनेला दिलेली ठाणे लोकसभा जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली. यासाठी भाजपने ३० जुलै २०२३ ला भाजपने ठाण्यात बैठक देखील घेतली होती. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी हा राजकीय बुद्धीबळाचा पट रचला होता. ज्यात एकनाथ शिंदे चेकमेट झाले.

ठाण्यासाठी भाजप आग्रही का? -

ठाणे लोकसभा मतदारसंघावर १९८९ मध्ये राम कापसे यांनी भाजपचा झेंडा रोवला. तेव्हापासून हा गड भाजपच्या ताब्यात होता. १९९६ पर्यंत हा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र, शिवसेनेबरोबर झालेल्या मैत्रीमुळे भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला दिला. त्या वेळी शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे या मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हापासून आतापर्यंत हा गड शिवसेनेच्या ताब्यात असून या मतदारसंघात सध्याच्या घडीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे नेतृत्व करत आहे.

या मतदारसंघातून विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, संदीप लेले आदींसह आणखी काही नावे चर्चेत आहेत. त्यातील कोणाला संधी मिळणार, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

भाजपसाठी जमेची बाजू -

ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला भाजपचे पाच आमदार आहेत. ठाणे संजय केळकर, एरोली गणेश नाईक, बेलापूर मंदा म्हात्रे आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात गीता जैन असे भाजपचे आमदार आहेत. तर कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे यांच्यामुळेही भाजपसाठी जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे भाजपला हा गड पुन्हा एकदा सहज जिंकता येऊ शकतो, असे भाजपच्या वरिष्ठांकडून बोलले जात आहे.

Thane politics news
One Nation One Election: 2024 अन् 2029 च्या दोन्ही निवडणुकांसाठी टाईमलाईन ठरली? कायदा मंत्रालयासमोर सादर करणार अहवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.