Explained: कसं असेल महाराष्ट्रातील जागावाटपाचे प्लॅनिंग; NDA VS INDIA, वंचित ठरणार कळीचा मुद्दा

इंडिया आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे पक्ष असतील तर विरोधात एनडीएमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे.
Explained
Explained
Updated on

Explained :  2024 नवीन वर्ष राजकारणासाठी महत्वाचं आहे. यावर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सहा प्रमुख पक्ष सत्तेसाठी मैदानात उतरणार आहेत. मात्र यापूर्वी लढाई रंगली ती जागावाटपाची, भाजपचा सामना करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र जागावाटपाचा तिढा कायम आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी इंडिया आघाडीच्या घटक पक्षात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

महाराष्ट्रात इंडिया आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे पक्ष असतील तर विरोधात एनडीएमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्ही गटात  जागावाटपाचा पेच कायम आहे. अशा स्थितीत जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. 

शरद पवारांचा डाव अखेरचा-

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने 2024 च्या निवडणुकीत 23 जागांची मागणी केली आहे, ज्याला काँग्रेसने विरोध केला तयार नाही. राज्यातील काँग्रेस नेते 22 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या गटातून अद्याप काहीही मागणी समोर आली नाही. कारण जागावाटपाची जबाबदारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे आता कितीही चर्चा, मागणी झाली तर शरद पवारांचा डाव अखेरचा असणार आहे.

निवडणूक जेवढी रंजक तेवढीच डोकेदुखी  -

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले होते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते. आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विभागली गेली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दोन गट पडले आहेत. शिंदे आणि अजित भाजपसोबत आहेत तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे मतदारांसाठी देखील ही निवडणूक जेवढी रंजक तेवढी डोकेदुखी ठरणार आहे.

शिवसेनेने का केली 23 जागांची मागणी ?-

शिवसेना 23 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, कारण गेल्या निवडणुकीत त्यांनी 23 जागांवर निवडणूक लढवली होती. शिवसेनेने महाराष्ट्रात लोकसभेच्या 18 आणि दादरा-नगर हवेलीसह 19 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या, तर पाच जागा गमावल्या होत्या. ते पुन्हा या 23 जागांची मागणी करत आहेत, ज्यावर काँग्रेस सहमत नाही. शिवसेनेत फूट पडल्याने 13 खासदारांनीही उद्धव यांची साथ सोडली आहे. त्याच वेळी, काँग्रेस 22 जागांची मागणी करत आहे, कारण गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करून काँग्रेस 25 जागांवर लढले होते आणि केवळ एक जागा जिंकली होती. तर राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीला सध्या किती जागांवर दावा करायचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Explained
Sanjog Waghere: अजितदादांचा विश्वासूच देणार पार्थ पवारांना आव्हान! ठाकरे गटाकडून लोकसभा लढवण्याची तयारी?

काँग्रेस घेणार संधीचा फायदा पण मताधिक्याचं काय?

राज्यात इंडिया आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. तिन्ही पक्ष एका रेषेत उभे आहेत. अशा  स्थितीत तिघांमध्ये समान जागा म्हणजेच 16-16 जागांचा फॉर्म्युला ठरू शकेल, असे मानले जात असले तरी उद्धव ठाकरे गट यासाठी तयार होणार नाहीत. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी 15-15 जागांवर निवडणूक लढवू शकतात, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 17 ते 18 जागा देता येतील का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडक यांच्या वंचित आघाडीसोबत देखील युती केली आहे. जर प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याचा निर्णय झाला नाही तर उद्धव ठाकरे वंचितला २ ते ३ जागा देण्याची देखील चर्चा आहे. मात्र वंचितने इतर ठिकाणी जर त्यांचे उमेदवार उभे केले तर अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघांचीही डोकेदुखी वाढणार आहे. हे गेल्या निवडणुकीत आपण पाहिलं आहे.

अजित पवार-एकनाथ शिंदेचं काय?

महाराष्ट्रात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्याचे प्रमुख मित्र आहेत. भाजपचे महाराष्ट्रात 48 पैकी 23 खासदार आहेत तर 2019 च्या निवडणुकीत भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. अशा स्थितीत भाजप 2024 मध्ये किमान 25 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उर्वरित 23 जागा शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला मिळू शकतात. जर भाजपने एक जागा कमी केली तर ते स्वतः 24 जागा लढवू शकतात आणि 24 जागा मित्र पक्षांसाठी सोडू शकतात. 24 जागांपैकी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 12 जागा मिळू शकतात.

Explained
Shivsena VS Congress: काँग्रेस शून्य आहे असं मी म्हटलं नाही, मात्र...; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.