प्रश्नोत्तरे

माझ्या त्वचेवर बऱ्याच ठिकाणी अधूनमधून फंगल इन्फेक्शन होत असते. औषधे घेतली तर बरे वाटते, पण औषधे बंद केली की लगेचच त्रास वाढतो.
Ayurveda
Ayurvedasakal
Updated on

प्रश्र्न १ - माझ्या त्वचेवर बऱ्याच ठिकाणी अधूनमधून फंगल इन्फेक्शन होत असते. औषधे घेतली तर बरे वाटते, पण औषधे बंद केली की लगेचच त्रास वाढतो. गेली ३-४ वर्षे असे चालू आहे. माझे हिमोग्लोबिन कमी आहे व मासिक पाळी नियमित येत नाही. या सगळ्याकरता मला काही उपाय सांगू शकाल का?

- सुचित्रा पाटील, पिंपरी

उत्तर : त्वचेशी निगडित त्रास असला तर त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदिक सिद्ध तेल लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः सध्या चालू असलेल्या पावसाळ्याच्या काळात अंगाला तेल लावण्याने जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. संतुलन अभ्यंग सेसमी वा कोकोनट सिद्ध तेलासारखे सिद्ध तेल आठवड्यातून २-३ वेळा तरी लावण्याचा उपयोग होईल.

तसेही त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने मंजिष्ठासॅन गोळ्या, अनंतसॅन गोळ्या, मंजिसार आसव वगैरेंपैकी कुठलेतरी रक्तशोधक औषध घेणे योग्य. शरीरात पित्तदोषाच्या संतुलनासाठी संतुलन पित्तशांतीसारख्या गोळ्यांचा फायदा होऊ शकतो. रोज रात्री झोपताना अविपत्तिकर चूर्णासारखे चूर्ण घेण्याचा फायदा मिळू शकेल. पित्ताचे संतुलन झाले व पोट साफ झाले की त्वचेचे आरोग्य आपसूक सुधारते.

हिमोग्लोबिन कमी आहे त्यासाठी रक्तधातूच्या पोषणासाठी आहाराची काळजी घ्यावी, जसे की पालेभाज्या, मनुका, खजूर वगैरेंचा आहारात समावेश ठेवणे, डाळिंबाचा रस घेणे, धात्री रसायन किंवा सॅन रोझसारखे रसायन घेमे उत्तम ठरेल. त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी संतुलन पंचकर्म करून घेणे योग्य होईल. अशा प्रकारचे त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शन बराच काळ राहिल्यास त्यातून अन्य त्रास उद्भवू शकतात. बरेच वर्ष असलेला अशा प्रकारचा त्रास संतुलन पंचकर्म करून घेतल्यावर सुधारणा झाल्याचा आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच रुग्णांचा अनुभव आहे.

मला वातरक्त म्हणजेच गाऊटचा त्रास असल्याचे नुकतेच निदान झालेले आहे. आहारात काय काळजी घ्यावी हे सांगावे.

- मनोज खंदारे, पुणे

उत्तर : वातरक्तामध्ये आपल्याला वातदोष व पित्तदोष या दोन्हींचाही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रक्ताची शुद्धी व वातशमन या दोन्हींचा विचार आहार व औषधे या दोन्हींमध्ये करावा लागतो. गाऊटचा त्रास होत असता रक्तात यूरिक ॲसिड वाढते असे आधुनिक शास्त्रांतही सांगितलेले आहे, ते याच्याशी बऱ्याच प्रमाणात जुळते.

आहारात गाय, म्हैस किंवा बकरीचे दूध घेणे उत्तम. शक्य झाल्यास दूध संतुलनचे शतानंत कल्प किंवा अनंत कल्प घालून घेणे जास्त उत्तम ठरू शकेल. आहारामध्ये गाईच्या तुपाचा वापरही उत्तम ठरतो. वरण-भात-पोळी-भाकरीवर तूप घेणे, तुपाची फोडणी, सूप वगैरेत वरून तूप घेणे, नियमित पंचामृत घेणे याचीमदत होऊ शकेल. शक्यतो जुन्या धान्यांचा वापर करावा. जव, तांदूळ, लाल तांदूळ, गहू तूर, मूग, मटकी यांचा आहारात समावेश असणे चांगले.

त्यातल्या त्यात आठवड्यातून २-४ वेळा तरी मूग, मसूर, मटकी, तूर वगैरे कडधान्यांपासून बनविलेले सूप रात्रीच्या जेवणात घ्यावे. त्यातही शक्यतो वरून तूप घातलेले चांगले. भाज्यांमध्ये कोहळा, पडवळ, दुधी, पालक यांचा समावेश अधिक प्रमाणात असावा. आंबवलेले पदार्थ वा पचायला जड असणारे पदार्थ तसेच फार आंबट फळे, वाटाणे, उडीद, चणे, छोले वगैरे टाळणे इष्ट. जमत असल्यास वैद्यांचा सल्ला घेऊन व्यवस्थित औषधयोजना तसेच संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे उत्तम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.