प्रश्र्न १ :
माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. बाळंतपणानंतर ३-४ महिन्यांनी माझी पाळी सुरू झाली. त्यानंतर दोन पाळ्यांमधले दिवस कमी होत होत सध्या २०-२१ दिवसांतच पाळी येते. ४-५ दिवस अंगावरून भरपूर जाते, त्यामुळे खूप अशक्तपणा येतो आहे. मध्यंतरी डॉक्टरांकडून २१ दिवसांच्या गोळ्या घेतल्या, तीन-चार महिने गोळ्या घेतल्या तेव्हा पाळी व्यवस्थित आली, नंतर परत पहिल्यासारखे सुरू झाले. यावर काही आयुर्वेदिक उपाय असल्यास कळवावा.
....स्वप्ना मालेगावकर
उत्तर : पाळी लवकर येणे व रक्तस्राव अधिक प्रमाणात होणे हे स्त्रीच्या प्रकृतीसाठी प्रतिकूल असते. रक्तधातू शरीराकरता अत्यंत आवश्यक असतो व तो कमी झाल्यास अन्य बरेच त्रास उद्भवू शकतात. आहारात खारकेची पूड, डाळिंब, खजूर, बीट रूट, वगैरे रक्तधातुवर्धक गोष्टींचा समावेश नक्की करावा. तसेच दिवसातून एकदा तांदळाचे धुवण घ्यावे. तांदळाचे धुवण कसे तयार करावे यासाठी डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवरचा ‘हीलिंग वॉटर’ हा व्हिडिओ नक्की बघावा. शरीरात पित्तदोषाचे संतुलन होण्याकरता संतुलन पित्तशांतीसारख्या किंवा प्रवाळपंचामृतसारख्या गोळ्या लगेच सुरू कराव्या. रोज रात्री झोपताना संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल पोटावर हलक्या हाताने लावावे. तसेच संतुलन फेमिसॅन सिद्ध तेलासारख्या तेलाचा पिचू नियमितपणे योनीभागी ठेवायला सुरुवात करावी. या त्रासाकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने गरज असल्यास औषधोपचार, शास्त्रोक्त पंचकर्म व उत्तरबस्ती करून घेण्याचाही फायदा होताना दिसेल.
प्रश्र्न २ :
मला आठ वर्षांची मुलगी आहे. गेली दोन वर्षे मी दुसऱ्या बाळाकरिता प्रयत्न करत आहे. तपासण्या केल्यावर माझ्यात काहीही दोष आढळलेला नाही. शुक्रधातूची तपासणी केल्यावर त्यात स्पर्म काउंट व मोटिलिटी कमी असल्याचे आढळून आलेले आहे. आय्.यू.आय्. करून गर्भधारणा होण्याची शक्यता आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण अशा प्रकारे प्रयत्न करण्याची आमची इच्छा नाही. काही उपचारांनी फायदा होऊ शकेल का ?....
उत्तर : सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये शुक्रधातुसंपन्नता बऱ्याच लोकांमध्ये कमी होताना दिसते. रात्रीचे जागरण, बाहेरचे खाणे-पिणे, निःसत्त्व आहार या सगळ्यांमुळे शुक्रधातूची पातळी कमी होते. शुक्रधातूची कमतरता असताना गर्भधारणा झाली तर गर्भपात होण्याची किंवा बाळामध्ये दोष येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शुक्रधातूसंवर्धनाकरिता प्रयत्न करून मगच गर्भधारणा होणे इष्ट राहील. रोज संतुलन चैतन्य कल्पासारखा कल्प टाकलेले गाईच्या नैसर्गिक दूध नक्की घ्यावे. तसेच शिंगाड्याची खीर आठवड्यातून २-३ वेळा घेण्याचा फायदा होऊ शकेल. आहारामध्ये डिंक, खारीक, तूप, लोणी, खडीसाखर वगैरेंचा वापर केल्याने शुक्रधातू वाढण्यासाठी मदत मिळू शकेल. आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचाही फायदा होऊ शकेल. शुक्रधातुपोषक बस्ती केल्यासही चांगला फायदा होताना दिसतो. शुक्रधातू संपन्न झाला की नैसर्गिकरीत्या गर्भधारणा व्हायला मदत मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.