मोमोज खाल्ल्याने एकाचा मृत्यू, AIIMS च्या तज्ज्ञांनी दिला इशारा

जर तुम्ही मोमोज खाण्याचे शौकीन असाल तर, दिल्लीतील एम्सने दिलेला इशारा वाचणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
Momos With Chutney
Momos With ChutneySakal
Updated on

नवी दिल्ली : जर तुम्ही मोमोज (MOMOS) खाण्याचे शौकीन असाल तर, दिल्लीतील एम्सने दिलेला (Delhi AIIMS) इशारा वाचणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. AIIMS ने लाल चटणीसोबत गरम मोमोज खाणाऱ्या लोकांना ते जास्त प्रमाणात चावून खाण्याचा सल्ला दिला असून, जास्त प्रमाणात चावून न खाल्ल्यास मोमोज खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते तसेच ते जीवावरही बेतू शकते असे सांगण्यात आले आहे. मोमोज खाल्यानंतर एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर एम्सच्या तज्ज्ञांनी वरील इशारा दिला आहे. तसेच याबाबत सर्व राज्यांना मार्गदर्शन तत्त्वे जारी केली आहेत. (AIIMS Issue Advisory On Momos Lover )

Momos With Chutney
आता काय तर मोमोज आइस्क्रीम रोल! नेटकरी म्हणाले खायचं कसं?

याबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण दिल्लीतील एका 50 वर्षीय व्यक्तीला मोमोजचे सेवन केल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर या व्यक्तीला एम्स येथे दाखल करण्यात आले. मात्र येथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, मृत व्यक्ती मोमोज खात खात दारूचे सेवन करत होता. त्यावेळी तो अचानक खाली कोसळला. पोस्टमॉर्टम रिपोर्टचा संदर्भ देत फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले की, मोमोज श्वसन नलिकेत अडकल्याचे सांगण्यात आले असून, तज्ज्ञांनी या समस्येचे वर्णन न्यूरोजेनिक कार्डियाक अरेस्ट असे केले आहे.

Momos With Chutney
स्टीम किंवा फ्राइड मोमोजचा कंटाळा आलाय? ट्राय करा मसाला मोमोज

ज्यावेळी एखादी व्यक्ती मोमोज सारखा पदार्थाचे सेवन करतो ज्याचा आकार मोठा असतो आणि जे पोटात गेल्यानंतर फुगण्याची दाट शक्यता असते, असे पदार्थ नेहमीपेक्षा अधिकवेळा चाऊन खाणे योग्य असते. मात्र, जर असे पदार्थ योग्य पद्धतीने चाऊन न खाल्यास हा पदार्थ विंडपाइपमध्ये जाऊन अडकण्याची शक्यता असते. यामुळे श्वसननलिका ब्लॉक होऊन मृत्यू होण्याची भीती असते. या घटनेबाबत नेमकं काय निदर्शनास आलं याबाबतची सविस्तर माहिती जर्नल ऑफ फॉरेन्सिक इमेजिंगच्या ताज्या अंकात देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.