Best Way To Eat Sprouts: मोड आलेले (स्प्राउट) कडधान्ये आरोग्यासाठी मोठे फायदेशीर असतात. यामध्ये अनेक आरोग्यवर्धक घटक असतात जे आपल्या शरीराला गरजेचे असतात. डाळी, हरबरे, वटाणे, नट्स, बीया असे अनेकांना भिजवून मोड आणून खाता येतात. यांना रात्री भिजवून नंतर ते एका कपड्यात बांधून ठेवले जातात. अशाने त्याला मोड येतात. मोड आल्यानंतर त्याच्यातील न्यूट्रीयंट्स अनेक पटीने वाढतात.
स्प्राउटला अजून पौष्टिक बनवण्यासाठी खालील गोष्टी करा-
१. पालेभाज्या-
स्प्राउटला अजून टेस्टी करण्यासाठी त्याच्यात कांदा, टमाटे, हिरवी मिर्ची, धने आणि इतर भाज्या एकत्र करू शकता. या भाज्या टाकल्यानंतर यातील ऍंटीऑक्सिडंटची मात्राही वाढते.
२. बीया-
यामध्ये तुम्ही भोपळ्याच्या, चिया आणि फ्लक्सच्या बीया टाकल्या तर स्प्राउट अजून हेल्दी आणि टेस्टी बनते. हे हेल्दी स्प्राउट खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. यात अनेक पोषकद्रव्ये असतात जी शरीराला गरजेची असतात.
३. सुकामेवा:
जर तुम्हाला सुका मेवा आवडत असेल तर तुम्ही स्प्राउट्समध्ये त्यांचा समावेश करुन त्यांना अधिक पौष्टिक बनवू शकता. बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड इत्यादी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे एकत्र खाल्ल्याने केवळ स्वादच नव्हे तर आरोग्यासाठीही बरेच फायदे मिळू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.