Akhad Special Recipe : आषाढचा आज शेवटचा रविवार असून अनेकांचा यावेळी मटण चिकन बनवण्याचा बेत ठरला असेल. चला तर मग यानिमित्ताने संडे स्पेशल एक खास आणि हटके रेसिपी जाणून घेऊयात. या रेसिपीचं नाव आहे रवा सुरमई फ्राय.
सुरमई फ्रायसाठी लागणारे साहित्य
सुरमई दीड पाव - अर्धा इंचाचे काप
आता सुरमई कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून कोरड्या करून घ्या. जेणेकरून त्याचं मॉइश्चर कमीत कमी राहील.
मॅरिनेशनसाठी आलं लसूण पेस्ट १ चमचा
हळद अर्धा चमचा, लिंबाच रस आणि मीठ
मसाला बनवण्यासाठी लाल तिखट - एक चमचा, धणे पुड एक चमचा, गरम मसाला १ चमचा आणि कोथिंबीर
वरच्या कोटिंगसाठी जाड रवा आणि रवा कच्चा हवा.
आणि एक चमचा तांदळाचं पीठ
सुरमई फ्राय बनवण्याची रेसिपी
फिश मॅरिनेट करण्यासाठी आधी एका बाऊलमध्ये सुरमाइ घ्या . त्यात आल्या लसणाची पेस्ट घाला. हळद घाला. मीठ घाला आणि लिंबाचा रस घाला.
आता व्यवस्थित सगळ्या सुरमईला चोळून घ्या. १५-२० मिनीट आता मॅरिनेशनसाठी ठेवा.
आता एक पसरट बाऊल घ्या. सुरमईच्या आऊटर कोटिंगसाठी जाड रवा घ्या. त्यात एक कप तांदळाचं पीठ मिसळा. मीठ घाला आणि त्यात थोडं चवीपुरतं लाल तिखट घाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. (Recipe)
आता मसाला तयार करा
मसाल्यासाठी एक दीड चमचा लाल तिखट घ्या, धणे पुड, जिरे पुड, मीठ घाला आणि आता हा ड्राय मसाला मिक्स करून घ्या आणि त्यानंतर त्यात ३-४ चमचे पाणी घाला. त्यात आता कोथिंबीर घाला. (Food)
आता मॅरिनेट केलेल्या सुरमईवर मसाला सगळ्या बाजूने चोळून घ्या.
आता रव्याच्या तयार केलेल्या मिश्रणात सुरमई घोळवून घ्या.
सुरमई तळण्यासाठी आधी तेल हाय फ्लेमवर गरम करा. सुरमई तेलात सोडताना फ्लेम कमी करून घ्या. आता साधारण ३-४ मिनीट तुम्ही सुरमई एका बाजूने तळून घ्या. नंतर तेवढ्याच वेळ दुसऱ्या बाजून तळून घ्या.
तुमची कुरकुरीत आणि चटपटीत रवा सुरमई फ्राय डिश तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.