Angaraki Sankashti Chaturthi 2024 : अंगारकी संकष्टीला बनवा 'या' स्पेशल प्रकारचे मोदक, बाप्पा खूश होऊन देईल आशिर्वाद

आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पासाठी आजच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य केला जातो.
Angaraki Sankashti Chaturthi 2024 : अंगारकी संकष्टीला बनवा 'या' स्पेशल प्रकारचे मोदक, बाप्पा खूश होऊन देईल आशिर्वाद

संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी’ म्हणण्याची प्रथा आहे. जून महिन्यातील ज्येष्ठ वद्य चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जात आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पासाठी आजच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य केला जातो. बहुतांश महिलावर्ग उकडीच्या मोदकाला अधिक प्राधान्य देतात. पण आम्ही तुमच्यासाठी खास अंगारकी चतुर्थीनिमित्त मोदकाचे वेगवेगळं प्रकार आणि त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत.

चॉकलेट मोदक

चॉकलेट ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट. दिवसातील कोणत्याही वेळी चॉकलेट समोर आले तरीही आपण त्याला नाही म्हणून शकत नाही. बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या आकारातही हे चॉलेट मोदक मिळू लागले आहेत. पण बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा चॉकलेट मोदक.

साहित्य

गडद चॉकलेटचे एक बार (किसलेले) -१ कप

खवा -ल२ कप

साखर - १ कप

वेलची पूड - १/२ टीस्पून

दालचिनी पावडर - १/२ चमचा

साच्यांना लावण्यासाठी तूप

बारीक चिरून बदाम - १/४ कप

कृती

खवा कढईत पातळ होईपर्यंत परतुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये किसलेले चॉकलेट घाला. चॉकलेट वितळवण्यासाठी मंद आचेवर ढवळत रहा. वेलची पावडर आणि दालचिनीची पावडर त्यामध्ये घाला. त्यानंतर मिश्रण पॅनच्या कडा सोडत नाही तोपर्यंत ढवळत रहा. गॅस बंद करा आणि मिश्रण एका डिशमध्ये ठेवा. थंड झाल्यानंतर साच्यांना तूप लावून घ्या आणि मिश्रण मोदक मोल्डमध्ये घालून त्याला व्यवस्थित आकार येईपर्यंत घट्ट मोल्ड घट्ट पकडा. काही सेकंदानंतर हळूवारपणे ते साच्यामधून काढा आणि ताटात ठेवा.

तळणीचे मोदक

बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही तळणीचे मोदक अगदी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात बनवू शकता. यासाठी तुम्हाला अधिक साहित्य लागणार नाही. तुम्ही उकडीच्या मोदकांचं सारणंही या मोदकांसाठी वापरू शकता.

साहित्य

गव्हाचे पीठ- १ कप

तूप - २ चमचे

एक चिमूटभर मीठ

तळण्यासाठी तेल

कोमट पाणी

खोबरे(सुकं किंवा ओले)

साखर चवी नुसार

20 ते २५ ड्रायफुट्सचेी भरड

वेलचि पूड

कृती

सर्वात आधी सुकं किंवा ओलं खोबरं, हलकं भाजून घ्या. यात ड्रायफुट्सचे तुकडे किंवा भरड घालून मिक्स करा नंतर त्यात साखर घालून सारणं तयार करुन घ्या. स्वादासाठी वेलचि पूडही सारणात मिक्स करा.

त्यानंतर गव्हाच्या पिठाची कणिक घट्ट मळुन घ्या. त्यात १ चमचा गरम तेलाचं मोहनदेखील घाला. पिठाची पारी लाटून लगेच त्यात सारण भरा आणि मोदकाच्या पाकळ्यांचे आकार द्या. तेल गरम झाल्यानंतर मोदक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. मग तयार झाले खुसखुशित तळणीच्या मोदकांचा नैवेद्य.

मावा / खवा मोदक

गणपती पूजेच्या वेळी प्रसाद म्हणून देण्यासाठी हे मोदक खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही खवा मोदकाचे रूपांतर ‘पेढ्यात‘ सुद्धा करू शकता.

साहित्य

मावा (खवा) -२ कप

साखर -१/२ कप

चिरलेले बदाम - २ टेस्पून

वेलची पूड -१/४ टीस्पून

दूध -१ टेस्पून

कृती

खव्याचा चुरा आणि साखर दोन्ही मिश्रण करुन नॉन–स्टिक कढईमध्ये घाला. मिश्रण सतत एक मिनिटभर मंद आचेवर शिजू द्या. साधारण ५ मिनिटे हे मिश्रण शिजू द्या. नंतर मिश्रण एका वाडग्यात ठेवा, आणि ४-ल५ तास बाजूला ठेवा.

त्यानंतर मिश्रणामध्ये बदाम आणि वेलची पूड मिक्स करा. आवश्यक असल्यास एक चमचा दूध घाला. त्यानंतर मोदकाच्या साच्याला थोडेसे तूप लावा. खवा मिश्रणातून एक छोटा गोळा घ्या, तो मोदक साच्यात एका बाजूला ठेवा आणि मोदक साचा घट्ट बंद करा. मग मोदक काढून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com