आज संकष्टी चतुर्थी असून अनेक गणेशभक्त संकष्टी निमित्त उपवास करतात. महिन्यातून एकदा येणाऱ्या संकष्टीहून अधिक महत्त्व अंगारकी संकष्टीला आहे. यंदा उद्या म्हणजेच 10 जानेवारीला मंगळवारी अंगारकी संकष्टी आहे. तर, चंद्रोदय रात्री 9 वाजून 4 मिनीटांनी आहे. या संकष्टीला असलेले महत्व पाहता इतरवेळी संकष्टी न करणारे लोक अंगारकी संकष्टी हमखास करतात.
काही लोक केवळ खिचडी आणि फराळाच्या विविध पदार्थांवर ताव मारण्यासाठी सुद्धा उपवास करतात. पण, नेहमी उपवास करणाऱ्या लोकांना भगरचे कौतूक नसते. त्यामूळे त्यांना या खास उपवासाला काहीतरी वेगळं आणि चमचमीत खायचं असतं.
उपवासाच्या दिवशी नेमकं काय फराळ घ्यावा? हा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. नेहमीचीच साबुदाणा खिचडी आणि वडे खावून कंटाळा आलेला असतो. त्यामुळे उपवासानिमित्त काही वेगळा पदार्थ मिळाला तर कोणालाही आवडेलच.
वडापाव सगळ्यांना आवडतो. स्पेशली बटाट्याची भाजी आणि त्यावरील बेसनाचे कोटींग खायला लोक तासंतास लाईनमध्ये थांबतात. हाच सगळ्यांचा फेवरेट बटाटेवडा उपवासालाही खाता आला तर...हो उपवासाला चालेल असा बटाटे वडा कसा बनवायचा हे पाहुयात
बटाटे वड्यासाठीचे साहित्य
4 उकडलेले बटाटे, वरीच्या तांदळाचे पीठ 2 वाटी,जिरे- 2 चमचे, आलें, 6 मिरच्या,साखर 1 चमचा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल
कृती
- उकडलेले बटाटे एका भांड्यात कुस्करून घ्या.
- त्यामध्ये मिरच्या, आले आणि जिऱ्याची पेस्ट घाला.
- चवीनुसार मीठ घाला. चमचाभर साखर घालून मिश्रण नीट मिक्स करा.
- या मिश्रणाचे लहान लहान गोळे करा.
- वरीच्या पीठात पाणी आणि थोडंस तेल घालून वडे किंवा भजी करताना बनवतो तसे मध्यम पीठ भिजवा.
- वरीच्या पिठात वडे घोळवून गरम तेलात तळा. त्यासोबत उपसावाला चालेल अशी चटणी अथवा शेगदाण्याच्या कोरड्या चटणीसोबत फराळी बटाटेवड्याचा आस्वाद घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.