मोनोपाॅजमध्ये चिडचिड होतेय? आहारात करा 'या' 6 गोष्टींचा समावेश

food
foodGoogle
Updated on

स्त्रिया जेव्हा मोनोपाॅज या परीस्थितीतून जातात तेव्हा त्यांची शारीरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी योग्य व्यायाम आणि आहारात योग्य फळांचा वापर करणे गरजेचे आहे. रजोनिवृत्ती ही मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांमध्ये होणारी सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा मोनोपाॅज यायला सुरुवात होते तेव्हा बऱ्याच महिलांच्यात शारीरीक आणि मानसिक बदल जाणवायला लागतात. मासिक पाळीच्या प्रक्रियेत बदल होतात. कधी- कधी काही महिन्यांनी तर कधी-कधी वर्षानी यायला सुरुवात होते. वयाच्या ४५-५५ व्या वर्षी रजोनिवृत्ती येण्यास सुरुवात होते. आज काल बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच महिलांना खूप लवकर येते. अशावेळी खूप गरम होणे, एकाग्रता ढासळणे, सतत टेंशन, सतत मूड खराब होणे अशा समस्या जाणवू लागतात. अशावेळी अॅन्टी इंफ्लेमेटरी फळांचा आहारात समावेश करण्याने तुम्हाला या त्रासापासून दूर राहण्यास थोडी मदत होईल.

स्ट्रॉबेरी :

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रासबेरी या फळांमध्ये अॅन्टी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे तुमचे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात. कार्डियोप्रोटेक्टिव योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत करतात. ऱ्हदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. ब्लूबेरीमध्ये अॅटी-ऑक्सिडेंट ची मात्रा जादा असते. जी मानसिक तणावात शांत राहण्यास मदत करते. त्याचबरोबर झोप लागण्यास मदत करते.

पालेभाज्या :

मोनोपॅाजच्यावेळी फळे आणि पालेभाज्या खाण्याचा फायदा होतो. कोबी, फूलकोबी, स्प्राउट्स, ब्रसेल्स अशा पानं असणाऱ्या भाज्यांचा समावेश जास्त करा. हिरव्या पालेभाज्या अॅस्ट्रोजन लेवल आरोग्यदायी ठेवण्य़ास मदत करतात. पोस्ट मेनोपॉज़ल महिलांना स्तन कॅन्सर सारख्या होणाऱ्या आजारापासून बचाव करतात.

बीन्स :

बीन्समध्ये फाइटोएस्ट्रोजेन असते. याशिवाय व्हिटामीन डी असते. मोनोपाॅजमध्ये हार्मोन कमी-जादा होत असतात. अशावेळी बीन्सची मदत होते. काळी बीन्स रक्तातील साखर कमी करण्य़ास मदत करते.

कडधान्ये :

मोनोपॅाजमध्ये आहारात कडधान्यांचा वापर भरपूर करावा. यात फायबर, प्रोटीन, व्हिटामीन बी, मॅग्नीशिअम असते. यामुळे शरीराला पोषकतत्वे मिळतात.

साल्मन मासा :

साल्मन माश्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. ट्राइग्लिसराइड आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास याची मदत होते. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, एंग्जाइटी आणि डिप्रेशनमधून बाहेर येण्यास याचा फायदा होतो.

डार्क चॉकलेटः

डार्क चॉकलेट मॅग्नीशियम चा मुख्य स्त्रोत आहे. महिलांना डायटमध्ये याचा वापर केला पाहिजे. डार्क चॉकलेटमुळे मूड ठिक होतो, झोप चांगली लागते.

हे खाऊ नका :

-मसालेदार पदार्थ आणि हाय कॅलरीज वाले पदार्थ आणि ड्रिंक्स घेऊ नका.

-लोणी एेवजी जैतून तेलाचा वापर करा.

-अल्कोहोल आणि स्मोकिंग करू नका

- प्राणायम आणि ध्यानधारणा करा.

Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.