हेल्दी रेसिपी : कांद्याची आमटी

Kandyachi-Aamati
Kandyachi-Aamati
Updated on

#fitindiamovement व ‘vocal for local’ या सध्याच्या महत्त्वपूर्ण चळवळीतून आपला पारंपरिक आहार, स्थानिक उत्पादने व नियमित व्यायाम ही निरोगी जीवनाची व पर्यायाने यशाचीही गुरुकिल्ली आहे, हे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपणही या लेखमालेतून आपल्या पारंपरिक, पौष्टिक खाद्यसंस्कृतीवर विचारविनिमय करीत आहोत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे ‘हेल्दी’ राहण्यासाठी किंवा ‘डाएट’ करण्यासाठी कोणत्याही परदेशी घटकांचा किंवा कोणत्याही ‘फॅन्सी’ वा ‘महागड्या’ डाएटचा आधार घेण्याची गरज नाही. आपला पारंपारिक, दैनंदिन आहारच आपल्याला ‘फिट’ ठेवू शकतो. आणि या ‘लॉकडाउन’च्या काळात तर आपणास याचा प्रत्यय आलाच आहे.

#fitindiamovementच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात तज्ज्ञांनीही हेच मत व्यक्त केले आहे. तेव्हा हा विचार किंवा ही चळवळ एखाद्या कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता याची ज्योत प्रत्येक घरात पेटली पाहिजे. कारण आपण स्वस्थ तर आपले कुटुंब स्वस्थ आणि त्यातून देशही आपोआपच स्वस्थ होईल. हो ना?

आपल्या खाद्यसंस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आई-आजींनी निरीक्षणातून अनेक घरगुती उपचारपद्धती निर्माण केल्या आहेत व वर्षानुवर्षे त्यांचे त्यांनी जतनही केले आहे. आजची ‘कांद्याची आमटी’ ही रेसिपी याचाच एक भाग आहे. बाळंतिणीला भरपूर दूध यावे यासाठी हा पदार्थ पूर्वी बाळंतिणीस पाचवीची पूजा झाल्यावर पुढचे काही दिवस खाण्यास दिला जात असे. हा पदार्थ जरी बाळंतिणीसाठी असला तरी इतरांनी चवीत बदल म्हणून खाण्यास हरकत नाही.

कांदा आपल्या स्वयंपाकातील अविभाज्य घटक आहे. कोशिंबीर, तोंडी लावण्याचे पदार्थ, भाज्या, कालवणे, मसाले या सर्वांमध्ये कांदा महत्त्वाचा घटक आहे. कांद्यामध्ये अँटी-इन्फ्लामेंट्री, अँटी-ऑक्सिडंट व व्हिटॅमिन ‘सी’ असल्यामुळे शरीराचे विविध आजारांपासून संरक्षण होते. कांद्याच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते, चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात, डोळ्यांची शक्ती वाढते. ज्वर, उष्णतेचे विकार यावर कांदा गुणकारी आहे. केस व त्वचेच्या आरोग्यासाठीही कांदा लाभदायक आहे.
रेसिपी

साहित्य - चिरलेला कांदा, तिखट/कांदा-लसूण मसाला, मीठ, तेल, हळद, धने पूड, जिरे, बेसन किंवा ज्वारीचे पीठ.

कृती - कांदा तेलात चांगला परतवून घेणे. तिखट, मीठ, हळद, धने पूड घालून परतणे व पाणी घालणे. उकळत असताना किंचित पीठ लावणे व उकळी आणणे. 
(रस साधारण दाटसर होण्याकरिता अगदी थोड्याच प्रमाणात पिठाचा वापर करावा.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.