हेल्दी रेसिपी : ज्वारीचे डाळीतील नागदिवे

Jwari-Dal-Nagdive
Jwari-Dal-Nagdive
Updated on

महाराष्ट्रात महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत ‘षडःरात्रोत्सव’ साजरा करण्याची प्रथा आहे. यालाच ‘सटीचे नवरात्र’ असे देखील म्हटले जाते. खंडोबाची उपासना, सटीची पूजा महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतातील विविध समाजांच्या कुळाचारातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

या संपूर्ण उत्सवातील प्रथा, कुळाचार, नैवेद्य, लोकपरंपरा या अलौकीक आहेत व त्या अभूतपूर्व गुंफलेल्या आहेत. खंडोबाच्या उत्सवातील व पूजेतील वाघ्या-मुरळी, विविध पत्री-फुले, घोडा व कुत्रा हे प्राणी, दिवटी-बुधली, गाठा, घाटी, शिक्का वगैरे गोष्टी केवळ पूजेतील आवश्यक बाबी नसून, त्यामागे खोल अर्थ दडला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

आणि भंडारा अर्थात हळदीचे महत्त्व भारतीयांना फार पूर्वीच कळले आहे, हे तर आपण जाणतोच. हीच बाब नैवेद्याची. नैवेद्यातील बाजरीचा ठोंबरा, बाजरीचे नागदिवे, रोडगा, भरीत, कांदा-लसूण पात, पुरणपोळी हे सर्व या ऋतूत उपलब्ध असते आणि त्यांचा आहारात समावेश करणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायकही असते. 

महाराष्ट्रात सटीच्या पूजनाला नागदिवे केले जातात. मैला-मैलावर भाषा बदलते तसेच रेसिपी आणि प्रथांमध्येही बदल जाणवतात. बाजरीसोबतच काही भागांत ज्वारी किंवा कणकेचे दिवे केले जातात. काही ठिकाणी मिठाचे, गोडाचे किंवा पुरणाचे दिवे असतात. काही ठिकाणी हे दिवे घरातील व्यक्ती खातात तर काही ठिकाणी गायीला खायला दिले जातात. एके ठिकाणी वरणफळे किंवा चकोल्यांप्रमाणे बनविली जाणारी एक रेसिपी मिळाली. या रेसिपीज अनोख्या आहेत. आपल्या रोजच्याच आहारातील असल्यामुळे आपण त्यांचा फारसा विचार नाही करत. पण हे पदार्थ प्रोटीन, कर्बोदके, मिनरल्स, व्हिटामिन्सनी युक्त एक योग्य ‘वन-डिश मिल’ किंवा ‘बॅलन्सड् मिल’ आहेत. पौष्टिक असण्याबरोबरच तुलनेने झटपट होणारे, पोटभरू, आजारपणात चव आणणारे व पचनास सुलभ असे हे पदार्थ आहेत.

रेसिपी
साहित्य - 

ज्वारीचे पीठ, तूर डाळ, मेथी दाणे, हिंग, मीठ, तिखट, हळद, धने पूड, कोथिंबीर.

फोडणी -
तेल, जिरे-मोहरी, कडीपत्ता 

कृती

  • ज्वारीचे पीठ चवीनुसार मीठ घालून भिजवून घेणे.
  • तूर डाळ, मेथी दाणे, हिंग व हळद घालून शिजवून घेणे.
  • फोडणी करून डाळीची आमटी करून घेणे. (आमटी खूप घट्ट नसावी)
  • आता यात पिठाचे दिवे एक-एक करून सोडावे व दिवे शिजेपर्यंत उकळावे.
  • तयार ज्वारीची दिवे सुगीतील आवडीच्या भाज्यांसोबत सर्व्ह करावेत.

टीप 

  • हे नागदिवे आमटीऐवजी फोडणीच्या आधणातदेखील करता येतात. 
  • नागदिव्यांऐवजी पिठाची फळं करून डाळ-फळं करता येतील.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.