आखाड महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला की, 'आखाड पार्ट्यां'चा जोर वाढतो. विविध मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी पाहायला मिळते तर शेतांमध्येही आखाड पार्ट्या रंगतात. आषाढ महिन्यात (आखाड) मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर असतो. अनेक जण घरगुती मांसाहाराचा बेत करुन आखाड साजरा करतात. ही तुमची आखाड पार्टी आणखी लज्जदार बनवायची असलेत त्याला सोलकढीची जोड द्या.
कोकण, मालवणातील हा प्रसिद्ध पदार्थ आरोग्यासाठी खुपच फायद्याचा आहे. नारळाचे दूध व कोकमाचा सार याचं मिश्रण म्हणजे ही कमाल रेसिपी, अगदी फार सामग्री नसल्याने झटपट उरकरणारी ही रेसिपी आहे पण बनवायला वेळ लागत नसला तरी याची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहते. तर या सोलकढीचे चाहते केवळ सर्वसामान्य व्यक्तीच नसून सेलिब्रिटीदेखील आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या दिग्गज गायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखलं जातं. आशा भोसले नेहमी चर्चेत असतात. दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या सोलकढी कशी बनवायची हे सांगत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आशा भोसले स्पेशल सोलकढी कशी बनवायची?
साहित्य
ओला नारळ
हिरवी मिरची
लसूण आलं
पाणी
कोकम
हिंग
चवीनुसार मीठ
साखर
कोथिंबिर
कृती
सोलकढी बनवण्यासाठी सर्वात प्रथम नारळ खवलून घ्या. त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खवललेला नारळ हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोड पाणी घालून एकजीव करुन घ्या. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर एका जाळीद्वारे हे दुध एका भांड्यामध्ये गाळून घ्या.
मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, आमसुलचे पाणी, आणि कच्च हिंग घाला हे मिश्रण पळीनं चांगलं एकजीव करा. मग सजावटीसाठी चिरलेली कोथिंबिर घाला. रेडी झाली तुमची आशा भोसले स्पेशल सोलकढी.
सोलकढीचे अनेक फायदे आहेत. अगदी वजन कमी करण्यापासून ते मधुमेहापर्यंत अनेक समस्यांवर सोलकढी उपयुक्त ठरते. सोलकढीतील मुख्य घटक हे शरिराला अनेक समस्येपासून दूर ठेवतात.
सोलकढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोकममध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. तर ओल्या नारळात प्रथिने, व्हिटॅमिन-सी, खनिजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी, तसेच त्वचेच्या सौंदर्यासाठी, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सोलकढी फायद्याची ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.