Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त राजगिऱ्यापासून बनवा ‘हे’ पदार्थ, एकदम सोपी आहे रेसिपी

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढीचे व्रत केले जाते. उपवास केला जातो.
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024esakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2024 : आज सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्व एकादशींपैकी एक असलेली ही आषाढी एकादशी सर्वात महत्वाची आणि मोठी मानली जाते. या एकादशीला देवशयनी आणि महाएकादशी म्हणून ओळखले जाते. ही एकादशी अतिशय शुभ, पवित्र आणि महत्वाची मानली जाते.

या महिन्यात भगवान विष्णूंची आराधना आणि पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. आजच्या दिवशी लोक भगवान विष्णूंची आणि विठ्ठलाची आराधना करतात. आजच्या दिवशी आषाढीचे व्रत केले जाते. उपवास केला जातो. या उपवासानिमित्त घरोघरी आज विविध प्रकारचे उपवासाचे खाद्यपदार्थ बनवले जातात. आषाढी एकादशीनिमित्त नेहमीची खिचडी आणि वरई खाण्यापेक्षा आज आम्ही तुम्हाला काही राजगिऱ्याच्या रेसिपींबद्दल सांगणार आहोत.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024 : पुरातन विठ्ठलाची मुर्ती वाचवण्यासाठी निंबाळकरांनी केला गनिमी कावा, मंदिर पाहून तुम्हीही फसाल

राजगिऱ्याचा शिरा

राजगिऱ्याचा शिरा हा चवीला खूपच चविष्ट लागतो. हा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी राजगिऱ्याचे पीठ तूपात भाजून घ्या. त्यानंतर, त्यात गूळ घाला. आता या मिश्रणातील गूळ वितळेपर्यंत ते चांगले शिजवून घ्या. त्यानंतर, त्यात दूध आणि सुकामेवा घाला. हे सर्व मिश्रण चांगले शिजवून घ्या. तुमचा राजगिऱ्याचा शिरा तयार आहे. याशिवाय तुम्ही राजगिऱ्याची खीर देखील बनवू शकता.

राजगिरा पराठा

आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही राजगिऱ्याचा पराठा देखील बनवू शकता. हा पराठा बनवायला अतिशय सोपा आहे. शिवाय, हा राजगिरा पराठा चवीला अतिशय उत्तम लागतो. हा राजगिरा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी राजगिऱ्याचे पीठ भाजून घ्या.

आता या पीठात बारीक केलेली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कुट घाला. त्यानंतर, चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण मळून घ्या. यासाठी गरम पाण्याचा वापर करा. त्यानंतर, या पीठापासून बारीक गोळे बनवून घ्या आणि पराठा लाटून घ्या. गरमागरम त्व्यावर तूप घालून हे पराठे खरपूस भाजून घ्या. तुम्ही दही किंवा काकडीच्या कोशिंबीरसोबत देखील हे पराठे सर्व्ह करू शकता.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024 : विठू माऊली तू, माऊली जगाची..! आषाढी एकादशीनिमित्त पाठवा 'या' खास शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.