Ashadhi Ekadashi recipes: ही कचोरी खाऊन उपवास मोडणार नाही, कारण, ही आहे फराळी कचोरी, पटकन लिहा रेसिपी

एकादशी... अन् दुप्पट खाशी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आणि ही प्रत्यक्षात प्रचलित आणण्याचे काण अनेक खवय्ये करत असतात.
Ashadhi Ekadashi recipes Make fasting kachori at home
Ashadhi Ekadashi recipes Make fasting kachori at home
Updated on

उद्या म्हणजेच, आषाढी एकादशी 17 जुलै 2024 ला साजरी होणार आहे. आषाढी एकादशी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विठ्ठल भक्त विठूरायाच्या चरणी लीन होतात. या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. उपवास केला जातो. उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या दिवशी काहीजण फलाहार करतात, तर काहीजण फराळाचे पदार्थ खातात.

खरंतर उपवास म्हटंल की, शाबुदाणा वडा, उपवासाची मिसळ, बटाट्याचे चिवडा, शाबुदाण्याचा चिवडा, वेफर्स असे अनेक पदार्थ डोळ्यांसमोर येतात.

एकादशी... अन् दुप्पट खाशी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आणि ही प्रत्यक्षात प्रचलित आणण्याचे काण अनेक खवय्ये करत असतात. अनेकजण उपवास फक्त विविध पदार्थांची चव चाखण्यासाठी करताना दिसतात. या खवय्यासाठी मी खास रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे उपवासाची कचोरी. घरी तुम्हीदेखील एकदा ट्राय कराच. (Ashadhi Ekadashi recipes Make fasting kachori at home)

उपवासाला थोडे चटपटीत पदार्थ मिळाले तर तोंडाला चव येते. कचोरी असा पदार्थ आहे जो सगळ्यांना आवडतो.

साहित्य

उकडलेले बटाटे अर्धा किलो

नारळ १

दही ५०० ग्रॅम

काळी मीरे पूड

गरम मसाला

शेंगादाणे

सिंगाड्याचे पिठ

साखर

लिंबू १

रिफाइंड तेल

कृती

एका बाउलमध्ये सिंगाड्याचे पिठ घेउन त्यात चवीनुसार सेंधे मिठ, दोन लहान चमचे तेल घालून व्यवस्थित मळून घ्यावे. उकडून सोललेले बटाटे मॅश करून घ्यावे. त्यात चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरे पूड, आमचूर, खिसलेले आले, चवीनुसार सेंधे सिठ हे सर्व मिश्रण व्यवस्थीत एकत्र करून घ्यावे. कचोरी भरण्यासाठी मिश्रण तयार आहे. पुरण भरल्याप्रमाणे सिंगाड्याच्या पिठात हे मिश्रण भरून घ्या. त्यानंत हे स्टफ केलेलं गोळं हलक्या हातानी लाटा. जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. अन् त्यानंतर तेलात तळून घ्यावे. मग तयार झाली तुमची उपवासाची कचोरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.