Fasting Recipes : नाश्त्यासाठी मऊ, जाळीदार उपवासाचा ढोकळा घरीच करा; ही आहे सोपी रेसिपी

हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. फक्त २ पदार्थ वापरून चवदार नाश्ता बनवू शकता.
Fasting Recipes
Fasting Recipessakal
Updated on

उपवासाच्या दिवसांत नेहमी नेहमी साबुदाणा, वरीचे तांदूळ साध्या पद्धतीने बनवले गेले तर खावंस वाटत नाही. साबुदाणा वडा, वरीचे डोसे बनवण्यात खूपच वेळ जातो आणि पदार्थ बिघडतात म्हणून अनेकजण हे पदार्थ बनवणं टाळतात. उपवासाच्या वेळेस नाश्त्याला खाण्यासाठी तुम्ही उपवासाचा ढोकळा ट्राय करू शकता. हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. फक्त २ पदार्थ वापरून चवदार नाश्ता बनवू शकता.

उपवासाचे ढोकळे बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात हा ढोकळा तयार होईल. हा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी 200 ग्राम भगर आणि 100 ग्राम साबुदाणे घ्या. मग दोन्ही पदार्थ वेगवेगळे वाटून घ्या. साबुदाणा सुद्धा व्यवस्थित बारीक दळून घ्या.

दोन्ही पदार्थ एकत्र करून यात पाणी आणि दही टाका. कधी कधी दही जास्त घट्ट असतं तर कधी जास्त पातळ जर दही जास्त घट्ट असेल गरजेनुसार अजून पाणी घाला. यात 1 टिस्पून आल्याची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. त्यात चवीनुसार मीठ घाला.

Fasting Recipes
Ashadhi Ekadashi recipes: ही कचोरी खाऊन उपवास मोडणार नाही, कारण, ही आहे फराळी कचोरी, पटकन लिहा रेसिपी

हे मिश्रण एकजीव केल्यानंतर जास्त कोरडे वाटत असेल तर तुम्ही पाणी घालून व्यवस्थित मिक्स करू शकता. यात 1 टेबलस्पून तेल घाला आणि 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या. ढोकळ्याच्या कुकरमध्ये किंवा एका भांड्याला व्यवस्थित ग्रीस करून त्याला तेल लावून घ्या. दुसरीकडे पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळं की थोड्यावेळासाठी गॅस मंद आचेवर ठेवा.

ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. इनो टाकल्यानंतर वेळ न घालवता लगेचच ढोकळ्याचे बॅटर ढवळून घ्या. मग ढोकळ्याचे बॅटर ढोकळ्याच्या डब्यात घालून 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्या.

फोडणी देण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करून त्यात जीरं, हिरवी मिरची आणि पाणी घाला. ढोकळ्याचे चौकोनी काप करून घ्या. तयार पाणी ढोकळ्यांच्या कापांवर घालून गरमागरम मऊ ढोकळा सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com