यंदाचं वर्ष ‘इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स’ अर्थात भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भरडधान्ये किंवा तृणधान्ये आपल्या भारतामध्ये पुरातन काळापासून पिकवली जात आहेत.
- अवंती दामले
यंदाचं वर्ष ‘इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स’ अर्थात भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भरडधान्ये किंवा तृणधान्ये आपल्या भारतामध्ये पुरातन काळापासून पिकवली जात आहेत. तृणधान्ये म्हणजेच ज्वारी, बाजरी, वरई, कोडो, नाचणी, राळे, कुंटु, राजगिरा इत्यादी. या तृणधान्यांचा वापर आपल्याकडील उपवासामध्येही केला जातो. या तृणधान्यांमध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक यांसारखे क्षार मिळतात- जे शरीरासाठी आवश्यक असतात. त्याच बरोबरीने प्रथिने, कर्बोदके आणि चोथा या आहारमूल्यांमुळे तृणधान्यांच्या पिठामुळे सेवनाने
रक्तातील शर्करा मर्यादित राहते.
पोट भरल्याची भावना निर्माण होते.
रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
हृदयविकाराचा धोका कमी होतो. पचन चांगले होण्यास मदत करून आतड्यांचे आरोग्य सुधारते.
शरीरास डिटॉक्स करण्यास मदत करून अॅन्टिऑक्सिडंट म्हणून काम करते.
अशी ही तृणधान्ये निरोगी जीवनशैलीसाठी संजीवनीच ठरत आहेत. आपण थोडासा आता मिलेट्सच्या दुष्परिणामांचा विचार करू या :
मिलेट्समध्ये असणाऱ्या फायटिक अॅसिडमुळे पोटॅशियम, लोह, कॅल्शिअमचे शरीरातील शोषण होण्यास अडथळा होऊ शकतो.
गॉट्रोजिनीक पॉलिफिनोलमुळे थायरॉइड ग्रंथींच्या कामास विरोध निर्माण होऊ शकतो.
हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपण मिलेट्सना चार ते सहा तास भिजवून अथवा भाजून, त्याचा ‘रवा’ काढून आपण आपल्या आहारामध्ये मिलेट्सचा वापर करू शकतो.
आपल्या आहारामध्ये आपण मिलेट्सच्या पिठापासून भाकरी, पराठा हे पदार्थ बनवू शकतो. त्याच बरोबरीने त्यांना भिजवून डाळीबरोबर मिश्रण करून त्यापासून इडली, डोसा, आंबोळी, धिरडी यांसारखे पदार्थही बनवू शकतो.
नाचणी, राजगिरासारखी धान्ये वापरून नाश्त्यासाठी porridge चा वापर आपण करू शकतो.
मिलेट्स उत्तम प्रकारे शिजण्यासाठी...
मिलेट्स नीट भाजून घ्यावेत. उदाहरणार्थ- उपमा, खिचडी बनवताना मिलेट्सचा रवा तेलावर नीट खरपूस भाजून घ्यावा.
मिलेट्सच्या तिप्पट प्रमाणात पाणी घालावे.
मिलेटस् पाण्यात ६ तास तरी भिजवून वाळवावे व त्यांचे नंतर पीठ दळावे अथवा रवा काढावा.
डोसा, आंबोली बनविण्यासाठी मिलेट्स २-४ तास भिजवून नंतर डाळीबरोबर वाटून परत ६-७ तास फुगू (Ferment) होऊ द्यावेत व नंतर त्याचे डोसे, इडली बनवावी.
आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण मिलेट्स खालीलप्रमाणे वापरू शकतो.
गव्हाच्या पिठात मिलेट्सचे पीठ एकत्र करून त्याची पोळी/ भाकरी बनवणे.
मिलेट्सच्या रव्यापासून उपमा, porridge बनवणे
मिलेट्स वापरून भात, पुलाव बनवणे.
मिलेट्सच्या पिठाचा वापर करून लाडू बनवणे.
मिलेट्सचा वापर सॅलड/ सूपमध्ये करणे.
अशा प्रकारे आपल्या आहारामध्ये धान्याबरोबर आवण तृणधान्यांचा (मिलेट्स) समावेश करून पोषक आहाराचे सेवन दररोज करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.