हिंगाचे त्वचेसाठी फायदे, असा करा हिंगाचा Skin Care साठी वापर

घरगुती तयार करण्यात येणाऱ्या विविध फेसपॅकमध्ये केवळ चिमुटभर हिंग टाकल्यास तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील. त्वचा खोलवर स्वच्छ होवून त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो येतो
hingache fayde
hingache fayde Esakal
Updated on

Benefits Of Hing : भारतीय स्वयंपाक घरातच Kitchen आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक सामुग्री दडलेली आहे. मग ते मसाले असो किंवा आलं, लसणू, कांदा असे पदार्थ.

अगदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं असो किंवा विविध आजारांवर प्राथमिक उपचार आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी स्वयंपाक घरातील हा खजिना कामी येतो. Beauty Care Tips Marathi Benefits of ASAFOETIDA hing for skin care

यापैकीच एक महत्वाचा घटक म्हणजे हिंग Hing. हिंगाच्या फोडणीमुळे पदार्थाची चव वाढते. स्वयंपाकात हिंगाचा वापर केल्यासे पचन Digestion होण्यास मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का, की याच हिंगाचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेच्या समस्या Skin Problems दूर करण्यासाठी करू शकता.

त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर तुम्ही तुमच्या स्किन केअर Skin Care रुटीनमध्ये हिंगाचा नक्कीच समावेश करू शकता.

घरगुती तयार करण्यात येणाऱ्या विविध फेसपॅकमध्ये केवळ चिमुटभर हिंग टाकल्यास तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील. त्वचा खोलवर स्वच्छ होवून त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो येतो.

त्वचेवर ग्लो येण्यासाठी हिंगाचा वापर

हिंगाच्या वापरामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर होण्यास मदत होते. तसंच यामुळे काळे डाग कमी होतात. सुरकुत्या आणि वाढत्या वयात चेहऱ्यावर दिसणारे डाग आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.

यासाठी एका टोमॅटोचा गर काढून तो बारीक मॅश करा. त्यात अर्धा चमचा साखर आणि चिमूटभर हिंग टाकून चांगली पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

हे देखिल वाचा-

hingache fayde
Skin Care: थ्रेडिंग केल्यानंतर या चुका करू नका, नाहीतर...

त्वचा सॉफ्ट होण्यास मदत

प्रदूषण तसंच विविध स्किन प्राॅडक्ट आणि मेकअपमुळे अनेकदा आपली त्वचा रुक्ष दिसू लागते. हिंगाच्या वापरामुळे त्वचा सॉफ्ट होण्यास आणि पुन्हा चमक येण्यास मदत होते.

यासाठी एका वाटीत १ चमचा गुलाबपाणी आणि १ चमचा दूध घ्या. यामध्ये अर्धा चमचा मध आणि चिमूटभर हिंग टाकून मिश्रण एकजीव करा. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहेरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून २-३ वेळा हा प्रगोय केल्यास तुम्हाला फरक जाणवेल.

त्वचा दिसेल तरुण

त्वचेसाठी हिंग अँटीएजिंग एजंटप्रमाणे काम करतं. हिंगाच्या वापरामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसंच मुरमांमुळे त्वचेवर आलेले डार्क स्पॉटही कमी होतात. यासाठी एका वाटीत मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी टाकून पेस्ट तयार करून घ्या. यात चिमूटभर हिंग टाकून ही पेस्ट चेहऱ्याला १० मिनिटांसाठी लावा.

त्वचेच्या इतर समस्या होतील दूर

हिंगामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते. जेणेकरून मुरुमांची समस्या कमी होते. एखाद्या संसर्गामुळे येणारी खाज किंवा रॅश कमी करण्यासाठी हिंगाचा वापर उपयुक्त ठरतो.

या शिवाय त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज राहण्यास आणि टॅनिंग दूर करण्यासाठी हिंगाचा वापर फायदेशीर ठरतो. अशा प्रकारे स्वयंपाक घरातील चिमूटभर हिंगामुळेदेखील तुमची त्वचा चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

hingache fayde
Brown Sugar Skin Benefits- ब्राऊन शुगरचा असा करा वापर, त्वचा दिसू लागेल तरुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.