Bread Potato Balls Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी बटाटा ब्रेड बॉल्स, ही आहे रेसिपी

Breakfast Recipe : आम्ही तुम्हाला ती बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही सहज स्वादिष्ट बटाटा ब्रेड बॉल्स बनवू शकता.
Bread Potato Balls Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी बटाटा ब्रेड बॉल्स, ही आहे रेसिपी
Updated on

बटाटा ब्रेड बॉल्स हा असा नाश्ता आहे जो लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप आवडतो. बऱ्याच वेळा व्यस्त वेळापत्रकामुळे नाश्ता तयार करायला फारसा वेळ मिळत नाही. अशा वेळी काही मिनिटांत बनवता येईल आणि घरातील सगळ्यांना आवडेल असा चविष्ट पदार्थ हवा. अशी परिस्थिती प्रत्येक घरात कधी ना कधी निर्माण होते.

अशा वेळेस बटाटा ब्रेड बॉल्स हा एक उत्तम पर्याय असू शकतो. जर तुम्ही ही रेसिपी अजून घरी करून पाहिली नसेल, तर आम्ही तुम्हाला ती बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

बटाटा ब्रेड बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेड - 4 स्लाइस, बटाटे - 7, लाल मिरची पावडर - 1 टीस्पून, जिरे - 1/2 टीस्पून, बडीशेप - 1/4 टीस्पून, कोथिंबीर - 1 टीस्पून, हिरवी मिरची चिरलेली - 1, तेल - तळण्यासाठी, मीठ - चवीनुसार

बटाटा ब्रेड बॉल्स कसे बनवायचे

बटाटा ब्रेड बॉल्स बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकळून घ्या. बटाटे उकळले की कुकरमधून बाहेर काढून सोलून घ्या. यानंतर, सर्व बटाटे एका भांड्यात ठेवा आणि ते चांगले मॅश करा. यानंतर ब्रेड क्रंब्स तयार करा. हे क्रंब्स मॅश केलेल्या बटाट्यात घाला आणि हाताने चांगले मिसळा. यानंतर या मिश्रणात जिरे, बडीशेप आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले मिसळा.

आता या मिश्रणात लाल तिखट, चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून सर्वकाही नीट मिसळा. बटाटा ब्रेड बॉल्स बनवण्यासाठी तुमचे मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण घेऊन त्याचे बॉल्स बनवा आणि एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा.

सर्व बॉल्स तयार झाल्यावर एक कढई घेऊन त्यात तेल घालून मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात बॉल्स टाकून तळून घ्या. 2 ते 3 मिनिटांत बॉल्स चांगले तळले जातील. ते सर्व गोल्डन होईपर्यंत तळा. यानंतर, ते एका प्लेटमध्ये काढा. सर्व बॉल्स त्याच पद्धतीने तळून घ्या. नाश्त्यासाठी स्वादिष्ट बटाटा ब्रेड बॉल्स तयार आहेत. त्यांना सॉस किंवा चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.