Breakfast History : अन् सुरू झाली नाश्त्याची परंपरा!

आपण सगळेच रोज नाश्ता करतो, डॉक्टरांच्या मतेही आपण रोज नाश्ता केला पाहिजे
Breakfast History
Breakfast Historyesakal
Updated on

Breakfast History : आपण सगळेच रोज नाश्ता करतो, डॉक्टरांच्या मतेही आपण रोज नाश्ता केला पाहिजे, सकाळी उठून आपण जेव्हा ऑफिस किंवा शाळेसाठी तयार होतो, तेव्हा आपल्या पहिली गोष्ट डोक्यात येते ती नाश्ता. आपल्याकडे हा समज आहे की खूप आधीपासून आपल्याकडे नाश्ता केला जातो. पण असं नाहीये.

Breakfast History
Bill Gates Phone : स्वतःच्या Microsoft कंपनीचा फोन वापरत नाही बिल गेट्स, कारण आहे खास

आत्ता आपल्या डेली रुटीनचा भाग असलेला नाश्ता आधी नव्हता.. इंग्रज भारतात आल्यानंतर ही संकल्पना किंवा असं म्हणू की तीन वेळेच खायची परंपरा सुरू झाली. त्याआधी लोकं फक्त दोन वेळेच जेवण करायचे. जे लोकं घरी असायचे असे थेट दुपारी आणि मग संध्याकाळी खायचे तर ज्यांना कामाला निघायच आहे असे लोकं सकाळी निघण्यापूर्वी जेवून जायचे.

1800 च्या काळात, सकाळी लवकर जेवण करणं हे अनेकांना पाप वाटायचं; Breakfast या शब्दाचा शब्दशः अर्थ घेत लोकं रात्रभराचा उपवास मोडणे हे पाप आहे अशा कल्पना करत होते. मग रोजगाराच्या संकल्पनेच्या निर्मितीबरोबरच काही अपवादही निर्माण झाले. दिवसभर कष्ट करणार्‍या कामगारांना, लहान मुलांना आणि म्हाताऱ्या लोकांना याची परवनागी होती.

Breakfast History
Chutney Batata Recipe : तिच तिच भाजी पोळी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा चटपटीत चटणी बटाटा रेसिपी

अशी सुरू झाली चहा, कॉफी पिण्याची सुरुवात

17 व्या शतकात युरोपमध्ये चॉकलेट, चहा आणि कॉफी या पदार्थांचा शोध लागला, अन् 19 व्या शतकासोबत इंग्रजांनी भारतातही ही पेय आणली. त्याआधी लोकं फक्त दूध घेत असत. यानंतर शिक्षित आणि श्रीमंत लोकं आपल्या कामाला निघण्याआधी एकत्र जमून नाश्ता करू लागली. यातूनच ब्रेकफास्ट टेबल आणि वर्तमानपत्र वाचण्याची पद्धत सुरू झाली.

Breakfast History
Hockey Player : मेजर ध्यानचंदचे शिष्य काढतायेत झोपडीत आयुष्य! एकेकाळी केलेला हॉलंडचा पराभव

इंग्रजांनी आपल्या नाश्त्यात तेव्हा ब्रेड आणि बटरचा समावेश केलेला.. एक असा पदार्थ जो न बनवता पटकन खाता येऊ शकतो म्हणून सगळीकडेच याची चर्चा सुरू झाली आणि ब्रेड बटर नाश्ता म्हणून सुरू झाला. या विदेशी पदार्थांवर उपाय म्हणून भारतीय लोकांनी आपले वेगळे असे पदार्थ शोधून काढले आणि ते नाश्ता म्हणून खाल्ले जाऊ लागले.1900 च्या काळातल्या याच औद्योकीकरणाच्या वाढत्या वेडासोबत बाहेर रस्त्यावर या नाश्त्याचे स्टॉल सुरू झाले आणि मग हळूहळू बाहेर बाजारात जेवण मिळू लागले.

Breakfast History
Travel Tips : क्रूर प्राण्यांनी गजबलेलं बेट, जेवण सुद्धा हेलिकॉप्टरने पोहचवावं लागतं

इन्स्टंट पदार्थांच वेड कमी नाही, आजच्या व्यस्त जीवनशैलीत, सोयीच्या दृष्टीने, जागतिक स्तरावर नाश्त्यासाठी तयार पदार्थांच्या उत्पादनांच्या विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. 2020 मध्ये जागतिक रेडी टू फूड मार्केट 2027 पर्यंत 5.5% वाढीसह (CAGR) $183.01 अब्ज एवढं होऊ शकतं. आशिया पॅसिफिक हा या संदर्भात सर्वात वेगाने वाढणारा विभाग आहे.

Breakfast History
Vastu Tips: घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे? काय सांगितलंय वास्तुशास्त्रात जाणून घ्या...

पण भारत याला जरा अपवाद आहे, Kellogg's आणि Pepsico (Quaker oats) सारख्या जागतिक प्रोडक्टसला भारतात तेवढा स्कोप नाही. बहुतेक पाश्चिमात्य देशांमध्ये, नाश्त्याच्या टेबलांमध्ये दूध/कॉफी, ब्रेड, अंडी आणि केलॉज सारखे पदार्थ असतात. पण भारताचं तसं नाही, भारतीय लोक एकतर नाश्ताच करत नाहीत नाहीतर आपले पारंपरिक पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.