Breakfast Recipe : हा ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभर देईल भरपूर एनर्जी, १५ मिनिटांत या पद्धतीने बनवा

चला तर मग पोहे चिला बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.
Breakfast Recipe
Breakfast Recipeesakal
Updated on

Breakfast Recipe : सकळी उठल्यानंतर नाश्त्याला काय बनवायचे हा पहिला प्रश्न. पोहे, इडली,बेसनाचा चीला पुन्हा पुन्हा खाण्याचा कंटाळा येत असेल, तर अनेकांना काहीतरी नवीन पदार्थ बनवासा वाटतो. तुम्ही नाश्त्यात अनेकदा पोहे खाल्ले असतील. मात्र पोह्याची ही रेसिपी तुम्ही क्वचितच ऐकली असेल. तुम्ही पोहे आणि बेसन मिसळून स्वादिष्ट पोहे चिला तयार करू शकता. पोहे चिला ही नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी असू शकते. पोहे चिला केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायी देखील आहे आणि सर्व वयोगटातील लोकांना तो आवडतो. विशेष म्हणजे हा चिला तुम्ही अवघ्या 15 मिनिटांत तयार करू शकता. चला तर मग पोहे चिला बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.

पोहे चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

स्वादिष्ट पोहे चिला बनवण्यासाठी १ वाटी पोहे, २ चमचे बेसन, २ चमचे रवा, १ टोमॅटो, १ कांदा, ५-६ हिरव्या मिरच्या, २ चमचे चिरलेली कोथिंबीर, ६-७ कढीपत्ता, एक चमचा. तीळ, लाल मिरची पावडर १/२ टीस्पून, हळद - १/४ टीस्पून, जिरे पावडर १/२ टीस्पून, तेल गरजेनुसार, मीठ चवीनुसार.

पोहे चिला बनवण्यापूर्वी या सर्व गोष्टी एकत्र गोळा करून त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्या. या गोष्टींच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत चविष्ट आणि आरोग्यदायी पोहे चिला घरीच तयार करू शकता. (Food)

Breakfast Recipe
Bad Food Combination: अंड्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; आरोग्यावर होईल वाईट परिणाम

पोहे चिला बनवण्याची सोपी रेसिपी

सर्व प्रथम पोहे स्वच्छ धुवून नंतर एका भांड्यात ठेवून पाण्याने धुवावेत. पोहे पाण्यात २-३ मिनिटे भिजवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. यानंतर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आता या गोष्टी पोह्यांच्या पेस्टमध्ये नीट मिसळा.

यानंतर या पेस्टमध्ये बेसन आणि रवा घालून चांगले मिक्स करा. आता या पेस्टमध्ये हळद, जिरे पावडर, तीळ, लाल तिखट आणि इतर सर्व मसाले घालून चांगले मिक्स करा. मिश्रण जेवढे व्यवस्थित बनेल तेवढे पोहे चिला चांगले बनतील. (Recipe)

Breakfast Recipe
Breakfast Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी मिक्स्ड व्हेज पराठा, ही आहे सोपी रेसिपी

आता या पेस्टमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट द्रावण तयार करा. यानंतर नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाकून पसरवा.

पोहे चिला थोडा वेळ भाजून घ्या आणि नंतर त्यावर थोडे तेल घाला. चिला दोन्ही बाजूंनी सोनेरी झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. चविष्ट पोहे चिला नाश्त्यासाठी तयार आहे. गरमागरम चटणीसह सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.