भारतीयांना पनीरचे विविध अन्नपदार्थ खायला खूप आवडतात. काही लोक ते कच्चे देखील खातात. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी पालक पनीर पराठा रेसिपी घेऊन आलो आहोत. पालक पनीरमध्ये भरपूर मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. पालक-पनीर पराठा बनवायला थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण, हा पराठा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मुले आनंदाने हा पराठा खातील. चला तर मग जाणून घेऊया पालक पनीर पराठा कसा बनवायचा.
200 ग्रॅम पालक
200 ग्रॅम पनीर
1 कप मैदा
पुदीना
कोथिंबीर
4-5 लसूण पाकळ्या
हिरवी मिरची ३-४
मेथी दाणे
तूप किंवा बटर
1 कांदा बारीक चिरून
आले, हिरवी मिरची बारीक चिरून
जिरे पावडर
धणे पावडर
चवीनुसार मीठ
सर्वप्रथम पालक नीट धुवून घ्या. कढईत पाणी गरम करून त्यात पालक टाका.
पालक शिजल्यावर बाहेर काढून थंड करा.
मिक्सर जारमध्ये उकडलेल्या पालकाच्या पानांसोबत कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने मिक्स करा.
त्यात लसूण आणि हिरवी मिरची घालून चांगली पेस्ट बनवा.
गव्हाचे किंवा मैद्याचे पीठ घेऊन त्यात एक चमचा तूप किंवा बटर टाका.
पालक पेस्ट घालून पीठ घट्ट मळून घ्या.
पनीर फिलिंग बनवण्यासाठी पनीर मॅश करा.
त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची टाका.
तसेच मीठ, जिरे आणि धनेपूड घालून मिक्स करा.
हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून ठेवायचे आणि पालकाच्या पीठाचे गोळे करुन त्याची छोटी पोळी लाटायची.
त्यामध्ये पनीरचे मिश्रण भरुन चारही बाजुने चौकोनी घडी घालायची आणि चौकोनी आकाराचे पराठे लाटायचे.
गॅसवर तवा गरम करुन त्यावर हे पराठे तेल घालून दोन्ही बाजुने भाजून घ्यायचे.