नाश्त्यात अनेकजण पराठे खातात. बटाटा, कोबी, मेथीपासून बनवलेले पराठे तुम्ही अनेकदा खाल्ले असतील. पण आज आम्ही तुम्हाला पराठे बनवण्याची एक अशी रेसिपी सांगणार आहोत, जी फक्त लवकर तयार होत नाही तर खायलाही खूप चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. हे मुळ्याचे पराठे आहेत. मुळा पराठ्याची चव लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडते. या पराठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पटकन तयार होतात. चला तर मग जाणून घेऊया मुळ्याचे पराठे कसे बनवायचे.
2 कप किसलेला मुळा
3-4 कप गव्हाचे पीठ
1/2 टीस्पून लाल तिखट
1/4 टीस्पून भाजलेले जिरे पावडर
1 टीस्पून आले चिरून
2-3 चमचे कोथिंबीर
चिमूटभर हिंग
2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
गरजेनुसार तूप किंवा तेल
चवीनुसार मीठ
मुळ्याचे पराठे बनवण्यासाठी प्रथम मुळा नीट धुवून किसून घ्या. यानंतर हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. आता एका भांड्यात गव्हाचे पीठ चाळून घ्या, त्यात थोडे तूप आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करा. आता पाण्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्या, ओल्या सुती कापडाने झाकून ठेवा आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा. नंतर किसलेला मुळा चांगला पिळून त्यातील पाणी काढून टाकावे.
आता एका भांड्यात मुळा ठेवा, त्यात तिखट, हिंग, हिरवी मिरची, कोथिंबीर, भाजलेले जिरेपूड, चिमूटभर मीठ आणि आले घालून सर्वकाही नीट मिक्स करा. तुमच्या मुळा पराठ्याचे फिलिंग तयार आहे. आता एक नॉनस्टिक पॅन मध्यम आचेवर गरम करा आणि पीठाचे गोळे करा. हे गोळे लाटून यामध्ये मुळ्याचे स्टफिंग भरा.
स्टफिंग भरल्यानंतर आता तुमचे मुळ्याचे पराठे लाटून घ्या. आता तव्यावर थोडं तूप लावा, लाटलेला पराठा तव्यावर टाका आणि भाजून घ्या. पराठा दोन्ही बाजूंनी गोल्डन झाला की, प्लेटमध्ये काढून घ्या. तुमचे चवदार मुळ्याचे पराठे तयार आहे, तुम्ही मुळ्याचे पराठे चटणी, दही किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.