Cheese Rice Cutlet Recipe: स्नॅक टाईममध्ये मुलांसाठी बनवा चीज राईस कटलेट, जाणून घ्या रेसिपी

आम्ही तुम्हाला उरलेल्या भातापासून टेस्टी चीज राईस कटलेट बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.
Cheese Rice Cutlet
Cheese Rice Cutlet sakal
Updated on

सर्व घरांमध्ये रात्री जेवल्यानंतर भात शिल्लक राहतो. डाळ आणि भाज्यांसोबत भात खाण्याऐवजी लोक त्यातून अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात. तांदूळ हा भारतातील मुख्यतः वापरल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. त्यातून अनेक प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात. बिर्याणी बनवण्यासोबतच तुम्ही उरलेल्या भातापासून पुलाव, कटलेट आणि इतर रेसिपी देखील बनवू शकता.

आम्ही तुम्हाला उरलेल्या भातापासून स्वादिष्ट चीज राईस कटलेट बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. चीज राईस कटलेट खायला खूप चविष्ट आहे आणि मुलांनाही ते खूप आवडते. हे चीज घालून बनवलेले असल्याने ते लहान मुलांनाही आवडते आणि तुम्ही ते टेस्टी डीपसोबत तसेच चटणी आणि सॉससोबत खाऊ शकता.

उरलेल्या भातापासून चीज राईस कटलेट कसे बनवायचे

  • कांदे तळून घ्या

  • कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोठा कांदा कापल्यानंतर तळून घ्या. आता लसूण पेस्ट घालून ट्रांसपेरेंट होईपर्यंत शिजवा. शिजल्यावर गॅस बंद करा.

भाज्यांचे मिश्रण बनवा

आता एका पॅनमध्ये उकडलेले आणि मॅश केलेले स्वीट कॉर्न टाका. कॉर्नमध्ये लाल मिरची, हळद, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालून थोडा वेळ शिजवा.

Cheese Rice Cutlet
Bad Food Combination: अंड्यांसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; आरोग्यावर होईल वाईट परिणाम

टिक्कीसाठी मिश्रण तयार करा

आता उरलेल्या भांड्यात भात काढून चांगले मॅश करा. भातामध्ये भाज्यांचे मिश्रण घाला आणि 2 चमचे भाजलेला रवा देखील घाला. जाड मिश्रण तयार करण्यासाठी सर्वकाही चांगले मिसळा.

कटलेट तयार करा

तयार मिश्रणापासून लहान टिक्की बनवा आणि मधोमध पनीर आणि चीज भरा आणि प्लेटमध्ये ठेवा.

टिक्की फ्राय करून घ्या

टिक्की बनवल्यानंतर पॅनमध्ये तळण्यासाठी तेल टाका आणि गरम झाल्यावर सर्व तयार कटलेट फ्राय करून घ्या. फ्राय केल्यांनतर हिरवी चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.