Cheesecake Recipe : घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून बनवा चिजकेक; रेसिपी आहे एकदम सोपी!

मुलांना केक खूप आवडतो पण दरवेळी बाजारातून आणणे शक्य होत नाही
Cheesecake Recipe
Cheesecake Recipeesakal
Updated on

Cheesecake Recipe : पूर्वी केवळ वाढदिवसाला केक खाल्ले जायचे पण आजकाल हवं तेव्हा केक खायची इच्छा झाली कि तुम्ही केक खाऊ शकता. बाजारात आजकाल अनेक प्रकारच्या केक्सचे ब्रॅण्ड्स मार्केटमध्ये आहेत. पण बाजारात बनलेले केक त्यात घातलेलं केमिकल आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे.

आपण सारेच जाणतो. बरं घरी केक बनवणं म्हणजे वाटतं तितकं सोप्प काम नाहीये. केक बनवणं म्हणजे फार किचकट काम. आज आपण एका वेगळ्या केकची रेसिपी पाहणार आहोत. तो आहे चीज केक.

Cheesecake Recipe
Christmas Cake : कहाणी भारतातील पहिल्या ख्रिसमस केकची; जाणून घ्या कसा अन् कुणी बनवला

मुलांना केक खूप आवडतो पण दरवेळी बाजारातून आणणे शक्य होत नाही. अशा वेळी मुले आग्रह धरू लागतात. घरात असलेल्या वस्तूंपासून तुम्ही टेस्टी चीज केक तयार करू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे याची चव लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही खूप आवडते.

चीज केक बनविण्यासाठीचे साहित्य

  • १०० ग्रॅम दही

  • १०० ग्रॅम बटर

  • १ टीस्पून कोको पावडर

  • व्हॅनिला एसेन्स

  • बारीक चिरलेले पिस्ता

  • दोन ते तीन चमचे कन्डेन्स्ड मिल्क

  • दोन चमचे क्रीम

  • चीज केक बनवण्यासाठी

  • बिस्किटे

सर्वप्रथम गोड बिस्किटे मिक्सरच्या भांड्यात काढुन घ्या. आता ती कटरच्या साहाय्याने बारीक चिरून घ्या. आता एका बाऊलमध्ये चिरलेली बिस्किटे घ्या आणि त्यात बटर घाला. त्यात कोको पावडर घालून चांगले मिक्स करावे.

केक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये दही घ्या. त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि क्रीम घाला. व्हॅनिला एसेन्सचे काही थेंब एकत्र घाला आणि चांगले मिक्स करा.

Cheesecake Recipe
Christmas Cake : ख्रिसमस केकचे हे ७ प्रकार तुम्हाला माहितीयेत का ?

चीज केक शिजवण्यासाठी ओव्हनची गरज भासणार नाही. फक्त बिस्किटाचे मिश्रण केकच्या साच्यात घ्या. दह्याचे मिश्रण एकत्र मिसळा. आता कढईत पाणी गरम करून त्यात स्टँड ठेवा. अॅल्युमिनियम फॉईलच्या साहाय्याने केकचा साचा बंद करा.

आता सुमारे अर्धा तास या केकला शिजू द्यावा. नंतर थंड होण्यासाठी ठेवा. केक रूम टेम्परेचरवर आला की फ्रीजमध्ये ठेवावे. साधारण चार ते पाच तास थंड होऊ द्या. मग तयार केलेला केक साच्यातून बाहेर काढून बादाम पिस्ताने सजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.