Chicken Soup : हिवाळ्यात शरीराला आतून ऊब देण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. चिकन सूपमध्ये हे घटक भरपूर प्रमाणात असतात. चला तर चिकन सूप बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.
चिकन सूप चविष्ट असण्याबरोबरच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिवाळ्यात हे सूप प्यायल्याने शरीराला ऊब मिळते. याशिवाय चिकन सूपमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, जे शरीराच्या विकासासाठी आवश्यक असते. सर्दी आणि खोकल्यासाठी चिकन सूप हा अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. हे प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. चला तर मग चिकन सूपचे फायदे आणि ते बनवण्याची रेसिपी जाणून घेऊयात.
जर तुम्ही हाय बीपीचे रूग्ण असाल तर तुमच्या आहारात चिकन सूपचा समावेश करून घ्या. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जे तुमचे हाय बीपी नॉर्मल करण्यास मदत करते. चिकन सूपमध्ये मात्र मिठाचे प्रमाण कमी असावे.
पोषक तत्वांनी युक्त चिकन सूप हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहे. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फोरस यांसारखे पोषक तत्व असतात. गाठींचे दुखणे दूर करण्यास सूपची मदत होते.
चिकनमध्ये प्रोटीनव्यतिरिक्त अमीनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. जे मांसपेशींच्या विकासासाठी फायदेशीर आहे. तेव्हा तुम्ही रोजच्या आहारात एक बाउल चिकन सूपचा समावेश करून घ्यावा.
चिकन सूप प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे सर्दी, फ्लू आणि इतर संसर्गांपासून तुमचा बचाव होतो. सूप प्यायल्याने सूजनसुद्धा कमी होते.
२५० ग्राम छोटे छोटे कापलेले चिकनचे काप, कापलेले कांदे, एक चमचा मैदा, १ चमचा काळे मिरे, गाजर आणि पत्तागोभी, चवीनुसार मीठ
सर्व प्रथम, कांदा बारीक चिरून घ्या, नंतर पॅनमध्ये पाणी घाला आणि गॅसवर ठेवा.
त्यात कापलेले चिकन घालून शिजवा.
दुसर्या पॅनमध्ये बटर घाला आणि ते वितळू द्या, आता कांदा आणि गाजर घाला आणि काही वेळ शिजू द्या.
आता त्यात मैदा घालून भाजीसोबत नीट मिक्स करा, आता त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर टाका आणि नीट ढवळून घ्या.
भाज्या मऊ होईपर्यंत सूप उकळत रहा.
भाजी शिजली की त्यात चिकन घालून मिश्रण नीट ढवळून घ्यावे.
तुमचे चिकन सूप तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.