हॉटेल सारखी मिरची भजी बनवा घरच्या घरी

हॉटेल सारखी मिरची भजी बनवा घरच्या घरी
Updated on

पावसाळ्याला सुरवात झाली आहे. बाहेर मस्त पाऊस पडत आहे. अशावेळी मस्त गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी मग चहा आणि भजी हवीच, है ना. भजीचे अनेक प्रकार आहेत त्यातील सर्वांची आवडती भजी म्हणजे मिरची भजी, तीच भजी हॉटेल सारखी घरच्या घरी कशी बनवायची ते जाणून घेऊयात.

हॉटेल सारखी मिरची भजी बनवा घरच्या घरी
पावसाळ्यात बनवा चमचमीत वांगी भजी! जाणून घ्या रेसिपी

साहित्य:

- ८ ते १० लांबड्या मिरच्या

- ३/४ कप बेसन

- १ टेस्पून तांदुळाचे पीठ

- १/४ टीस्पून हळद

- चिमूटभर खायचा सोडा

- चवीपुरते मीठ

- तळण्यासाठी तेल

हॉटेल सारखी मिरची भजी बनवा घरच्या घरी
स्वादिष्ट कुरकरीत पालक भजी, बनवा घरच्या घरी

कृती:

- सुरवातीला मिरच्या धुवून घ्याव्यात.

- एका बाजूने चीर देऊन आतील बिया काढाव्यात.

- बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साधारण पाउण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवावे.

- सोडा घालून मिक्स करावे.

- पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी.

- तळणीसाठी तेल तापत ठेवावे.

- मिरच्या पिठात बुडवून नीट कोट करून घ्याव्यात.

- मध्यम आचेवर तळाव्यात.

- तयार मिरची भजी गरमागरम सर्व्ह कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.