Manchurian Recipe: पाकिस्तानचे नाव ऐकले तरी आपले कान लगेच टवकारतात... मनात थोडीशी धडकी पण भरते. दरम्यान न्यूयॉर्क टाईम्सने सांगितलेल्या एका बातमी नुसार, चिकन मंच्युरियान हा पदार्थ चायनिज नसून याचे मूळ पाकिस्तानातले आहे. आपण कोणत्याही चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो तर तिथे मेन्यू मध्ये एक पदार्थ हमखास दिसतो अन् तो म्हणजे मंचूरियन अगदी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही रुपात.
न्यूयॉर्क टाइम्सने नुकत्याच प्रकाशित केलेल्या रेसिपीमध्ये चिकन मंचुरियनचा उल्लेख “पाकिस्तानी चायनीज स्वयंपाकाचा अविभाज्य” असा उल्लेख केला, रेसिपीमध्ये नमूद केले आहे की ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात पाकिस्तानातील लाहोरमधील हसीन कुआंग इथे सर्व्ह करणारी डिश पुन्हा तयार करण्याच्या प्रयत्नातून ही रेसिपी आली आहे.
याच्या ट्विटरने सगळीकडेच खळबळ उडाली आहे आणि ट्विटरवर यावरुन प्रचंड विरोध होतो आहे. दरम्यान “ही पाकिस्तानी डिश कधीपासून आहे”, असे एका वापरकर्त्याने लिहिले, तर दुसर्याने टिप्पणी केली, “त्या रेसिपीमध्ये पाकिस्तानी काय आहे?”
बघुया तज्ञ नक्की काय म्हणताय?
डॉ. कुरुश दलाल, पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि पाक मानववंशशास्त्रज्ञ यांच्या मते, “आग्नेय आशियामध्ये, कोंबडी भारतीय लाल जंगली पाखरांचा वंशज म्हणून ओळखली जाते. दरम्यान, 'मंचुरियन' या शब्दाचा अर्थ मंचुरियाचा मूळ किंवा रहिवासी (ईशान्य चीनमधील) असा होतो. पण, ही डिश भारतातील चायनीज रेस्टॉरंटची निर्मिती आहे आणि पारंपारिक मांचू पाककृतीशी त्याचे फारसे साम्य नाही.”
ते पुढे म्हणाले की, या बहुचर्चित डिशचा शोध १९७५ मध्ये मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे कूक नेल्सन वांग यांनी लावला होता, जेव्हा एका ग्राहकाने त्यांना मेनूमध्ये उपलब्ध असलेल्यापेक्षा वेगळी एक नवीन डिश तयार करण्यास सांगितले. पण, डिशचा शोध कोणी लावला हे दाखवण्यासाठी कोणताही पुरावा नाही आणि त्याचा नेमका उत्पत्ती शोधणे कठीण आहे,
चिकन मंचुरियन हे चिकनचे तुकडे सोया सॉसच्या मिश्रणात डिप करुन तयार केले जाते आणि आले, लसूण आणि हिरव्या मिरचीच्या जाड सॉससह कुरकुरीत होईपर्यंत तळलेले असते. नंतर ते सोया सॉस ग्रेव्हीमध्ये आणि कधीकधी व्हिनेगरमध्ये टाकून राईस किंवा नूडल्ससह सर्व्ह केले जाते. शाकाहारी लोकांसाठी यात चिकनच्या जागी फुलकोबी टाकतात आणि सामान्यतः गोबी मंचुरियन म्हणून ही डिश ओळखली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.