Chocolate Day 2022: चवीप्रमाणेच गोड आहे चॉकलेटची कहाणी

Chocolate Day 2022 Blog
Chocolate Day 2022 Blog
Updated on

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून झाली आहे. व्हॅलेंटाईन वीकमधला एक दिवस गोड असावा म्हणुन कदाचित 9 फेब्रुवारीला चॉकलेट (Chocolate) डे साजरा केला जातं असावे असा ही तर्क काही जोडपी (Partner) लावतात. या दिवशी लोक आपल्या जिवलगांना प्रेमाने चॉकलेट देतात आणि त्यांचे प्रेम व्यक्त करतात. खरे तर सर्व वयोगटातील लोकांना चॉकलेट खायला आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चॉकलेट खाण्यात उत्सुक दिसतात. चॉकलेट कधीही खाऊ शकतो आणि यामुळेच प्रत्येक उत्सवात त्याचा समावेश केला जातो. थोडक्यात काय तर कीस मी पासुन ते डेरी मिल्क पर्यंत सर्व चॉकलेट आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आवर्जून चॉकलेट खा. (Chocolate Day 2022 Blog)

Chocolate Day 2022 Blog
मुलांनो, गर्लफ्रेंडला कोणत्या प्रकारचं चॉकलेट आवडतं यावरून ओळखा तिचा स्वभाव!

कुछ मिठा हो जाये...

तुम्ही जे चॉकलेट आपल्या प्रिय व्यक्तीला देता किंवा खातो त्या चॉकलेटाची निर्मिती कशी आणि कुठे झाली हे तुम्हाला माहित असावं. आज आम्ही तुम्हाला चॉकलेटचा इतिहास सांगू. चॉकलेटच्या उत्पत्तीची कथा त्याच्या चवीप्रमाणेच उत्तम आहे. जसा प्रत्येक गोष्टीचा काही ना काही इतिहास असतो तसाच ह्या चॉकलेटमागे देखील एक मोठा इतिहास आहे.

चॉकलेट हे विषुववृत्तीय प्रदेशातील कोको झाडाच्या बियांपासून बनणारा खाद्यपदार्थ आहे. कोको झाडांची मेक्सिकोमधे ३,००० वर्षांपासून लागवड केली जातेय. इ.स.पू.१,१०० पासून मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कोकोच्या वापराचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. सर्वात आधी हे फळ कोको च्या झाडावर बघितलं गेलं आणि तेव्हापासूनच चॉकलेट बनविण्याची सुरवात झाली. सुरवातीला चॉकलेट खाल्ले नाही तर प्यायले जायचे. त्याची चव अतिशय कडू - तिखट असायची.

Chocolate Day 2022 Blog
डार्क चॉकलेट खाल्ल्याने कर्करोगापासून होऊ शकतो बचाव, अभ्यासात स्पष्ट
Happy Chocolate Day
Happy Chocolate Day esakal

प्राचीन लोक कोको ह्याला देवाचं एक वरदान समजलं जायचं. लोक ह्याची पूजा करायचे आणि त्याला देवाचे जेवण म्हणून त्याचा सन्मान करायचे. आधीच्या काळात चॉकलेट असं कोणीही खाऊ शकत नव्हतं. प्राचीन माया सभ्यतेनुसार चॉकलेट हे केवळ शासक, योद्धा, पुजारी, आणि उच्चस्तरावरील लोक यांच्या उपभोगाची वस्तू समजले जायचे. त्यामुळे केवळ ह्या लोकांनाच चॉकलेटचा वापर करण्याचा अधिकार होता. जर कुठल्याही इतर व्यक्तीने त्याचे सेवन केले तर त्याला माया समाज कठोर दंड द्यायचा. सुरवातीच्या काळात चॉकलेटची चव अतिशय कडू होती. त्यानंतर त्याची चव बदलण्याकरिता त्याला भाजून, किसून त्यात पाणी, वॅनिला, मध, फळे आणि इतर काही मसाले मिसळण्यात आले. पूर्वी काही भागात ह्याला शाही पेय समजलं जायचं, याचा उपयोग केवळ काही विशिष्ट कार्यक्रमांत केला जायचा. १४ व्या शतकातील लोक ह्याचा वापर मुद्रा म्हणून करायचे. ह्याची देवाण घेवाण करून वस्तूंची खरेदी विक्री व्हायची. म्हणजेच त्यावेळी चॉकलेट खूप महत्वाचे होते. हा होता चॉकलेटचा इतिहास आणि त्याच्या उत्पत्तीची कहाणी. ह्यावरून हेच कळून येते की आज आपण जे चॉकलेट खातो ते काही तसच्या तसं बनवलं गेलं नव्हतं, तर त्याचे प्रारंभिक स्वरूप हे अतिशय वेगळे होते.

Chocolate Day 2022 Blog
सोनाली कुलकर्णीला कुणालने वाळवंटात केलं प्रपोज, सिद्धार्थ-मितालीची तर गोष्टच हटके!

ज्या लोकांना चॉकलेट आवडत नाही त्यांच्याजवळ ह्याला वाईट ठरविण्याची अनेक कारणे असतात. त्यातूनच चॉकलेट विषयी काही मिथके देखील प्रसिद्ध आहेत. पण ती केवळ मिथकेच आहेत. काही लोकांच्या मते चॉकलेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅफीन असते त्यामुळे चॉकलेटचे सेवन करू नये. पण जर तुम्ही चॉकलेटचा एक बार खाल्ला तर त्यात जेवढं कॅफीन असतं त्याहून कितीतरी जास्त कॅफीन हे एक कप कॉफीत असते. अनेकांना असे देखील वाटते की चॉकलेटमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते आणि त्याने कॉलेस्ट्रोल वाढते. तर असं काही नसतं. ह्याबाबत अनेक रिसर्च करण्यात आले आहेत आणि त्यात हे सर्व खोटं असून चॉकलेट खाल्ल्याने असं काहीही होतं नसल्याचं सांगितलं गेलं.

Chocolate Day 2022 Blog
के पॉप आहार घेतल्याने वजन कसं कमी होईल जाणून घ्या!
chocolates
chocolatesesakal

एवढचं काय तर वैज्ञानिकांनुसार १.४ ऑन्स चॉकलेट रोज खाणे चागंले असते त्याने कॉलेस्ट्रोल स्थिर राहते. चॉकलेटमध्ये कुठलही पोषक तत्व नसतं म्हणू चॉकलेट खाण्यात काहीही फायदा नाही असेही अनेकांना वाटते. तर चॉकलेट हे मॅग्नेशियम, कॉपर, आयरन आणि झिंक यांचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चॉकलेट खाल्ल्याने वजन वाढते. कुठल्याही गोष्टीचा अतिवापर किंवा अतिसेवन हे नुकसानदायकच असतं. पण जर चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याने आपले वजन वाढत नाही. आज जी चॉकलेट आपण खातो त्यात आपल्याला निरनिराळे फ्लेवर्स मिळतात, वेगवेगळ्या स्वरुपात ही चॉकलेट आपण खातो. भविष्यात त्यावर आणखी प्रयोग होऊन त्यात आणखीन बदल होत राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.