पावसाळ्याच्या दिवसात बनवा झटपट कॉर्न सूप

पावसाळ्याच्या दिवसात बनवा झटपट कॉर्न सूप
Updated on
Summary

जर तुम्हाला पावसात भिजल्यानंतर काहीतरी खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कॉर्न सूप चा आस्वाद घेऊ शकता.

पावसाळा सुरू होताच बाजारात काही ठिकाणी कॉर्न दिसू लागतो. आजकाल कॉर्न सगळीकडे सहज उपलब्ध होतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवामान थोडे थंड होते, त्यावेळी जर गरम सूप पिण्यास मिळाला तर मज्जाच वेगळी. पावसाळ्यात कॉर्न सूप (corn soup)पिण्यास एक वेगळाच आनंद असतो. पाऊस पाहताना आपण घरी बसून कॉर्न सूप पिऊ शकता. हे आरोग्य आणि चव या दोन्हीच्या दृष्टीने खूप चांगले आहे. जर तुम्हाला पावसात भिजल्यानंतर काहीतरी खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कॉर्न सूप (corn soup)चा आस्वाद घेऊ शकता. (corn soup recipe for rainy season)

पावसाळ्याच्या दिवसात बनवा झटपट कॉर्न सूप
टेस्टी आणि हेल्दी 'ब्रोकोली सूप' करा घरीच; जाणून घ्या रेसिपी

साहित्य :

- कॉर्न - 1 वाटी

- गाजर - १

- कांदा - १

- मैदा पीठ - 2 टिस्पून

- लोणी - 50 ग्रॅम

- काळी मिरी पावडर - अर्धा चमचे

- मीठ - चवीनुसार

- थोडा व्हिनेगर

पावसाळ्याच्या दिवसात बनवा झटपट कॉर्न सूप
क्रीमी वेजेटेबल सूप बनवण्याची सोपी रेसिपी

कृती :

- सुरवातीला उकडलेले कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

- आता नॉन स्टिक पॅन ठेवा आणि त्यात कॉर्न, गाजर आणि कांदा घालून 10 मिनिटे शिजवा.

- आता या भाज्यांमध्ये कॉर्न पेस्ट घाला आणि थोडावेळ शिजवा.

- आता थोडे व्हिनेगर आणि मीठ घाला. त्यांनतर थोडे पाणी उकळवा.

- हे पाणी भाज्यांमध्ये घाला आणि 2 चमचे सर्व पीठ मिक्स करावे.

- त्यावर काळी मिरीची पूड आणि लोणी घाला आणि थोडावेळ शिजू द्या. ते एकत्र मिसळले की गॅस बंद करा.

- अशाप्रकारे तुमचा कॉर्न सूप तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.