Cucumber For Summer: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने होतात ४ फायदे

एकदम उन्हाळा वाढल्याने शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात
Cucumber For Summer
Cucumber For Summer
Updated on

Cucumber Health Benefits: सध्या वाढत्या उन्हामुळे सारेच त्रस्त आहेत. अशाप्रकारे एकदम उन्हाळा वाढल्याने शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे हा पर्याय उरतो. पण काही भाज्या आणि फळ खाऊनही तुम्हाला फायदा होतो. उन्हाळ्यात मिळणारी काकडी हा एक उत्तम पर्याय आहे. काकडी सूपरफूड आहे. शरीरातले पाणी योग्य प्रमाणात राखण्याबरोबरच ती उष्णतेपासून संरक्षण करते. तसेच काकडीत असणाऱ्या विविध गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात काकडी खाल्याने तुमचा उन्हापासून बचाव करता येऊ शकतो. ती खाल्ल्याने तुम्हाला चार फायदे मिळतात.

Cucumber For Summer
Stealth Omicron: स्टेल्थ ओमिक्रॉन कसा आहे? अशी आहेत लक्षणे!

असे आहेत चार फायदे

१) पाण्याची कमतरता- उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असणे सामान्य आहे. पण शरीरात जर वारंवार पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेशन, पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा समस्या निर्माण होतात. काकडीत ९० टक्के पाणी असते. शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी आहारात काकडीचा समावेश करू शकता.

२) वजन कमी करणे- तुम्हाला उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर काकडी खाणे हा उत्तम पर्याय आहे. यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असल्याचे आढळते. यामुळे वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. काकडी सॅलेड म्हणूनही खाता येते.

Cucumber For Summer
Weight Loss Tips | या पाच गोष्टी खा, पोटाची चरबी होईल कमी

३) पोटासाठी- काकडी पोटासाठी खूप चांगली मानली जाते. जर तुम्हाला पचनाशी संबधित समस्या असतील तर काकडी खाता येऊ शकते. काकडीत फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अन्न सहज पचते. तसेच पोटाशी संबधित समस्या टाळता येतात.

४) एनर्जीसाठी- जर तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल तर डाएटमध्ये काकडीचा समावेश करा. काकडीत अॅंटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास तसेच शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.