Dasra special Recipes : दस-या निमित्त 'या' खास पदार्थांनी वाढवा सणाचा गोडवा

यंदा या झटपट आणि हटके अशा गोड पदार्थांच्या रेसिपीज अवश्य ट्राय करा.
Dasra special Recipes
Dasra special Recipesesakal
Updated on

Dussehra Special Sweet Recipes : कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा पुन्हा सणावाराला उत्साहात सुरूवात झाली आहे. त्यामुळे घरात छान पंचपक्वान्नांचे बेत रंगतात. तसे प्रत्येक सणाला घरातील गृहिणींची स्वयंपाक घरात विशेष रेलचेल असते. घरातल्या माणसांसाठी छान गोडा-धोडाचे बनवावे असाच त्यांच्या प्रयत्न असतो.

Dasra special Recipes
Recipe: हेल्दी व्हेजिटेबल चीझ चीला कसा तयार करायचा ?

जर तुम्ही दरवर्षी तेच तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल वा गृहिणींना तोच तोच पदार्थ बनवून कंटाळा आला असेल तर यंदा या झटपट आणि हटके अशा गोड पदार्थांच्या रेसिपीज अवश्य ट्राय करा.

Dasra special Recipes
Food Recipe : 'या' सोप्या पद्धतींनी काही मिनिटांत घरीच बनवा चुरमुरे

मालपुआ

साहित्य

  • १ वाटी मैदा

  • १ वाटी खवा

  • साखरेचा पाक

  • तूप

  • पिस्ता, बदाम, केशर

Dasra special Recipes
Recipe : घरीच बनवा बनारसी स्टाईलचा चहा; कसा तयार करायचा पहा..

कृती

प्रथम पीठ तयार करा. यासाठी पिठात पाणी घालून मिक्स करावे. नंतर दुसरे पीठ बनवा ज्यामध्ये खवा आणि पाणी एकत्र करून मिक्स करा. आता ही दोन्ही पीठ एकत्र करा. ते खूप पातळ किंवा जास्त जाड नसावे. एका कढईत मंद आचेवर तूप गरम करा आणि आधी तयार केलेले पीठ गोलाकार पसरवा. मालपुआची एक बाजू शिजली की उलटी करून दुसरी बाजू शिजवा. मालपुआचा रंग बदलू लागला की कढईतून काढून गोड पाकात बुडवून घ्या. थोडा वेळ ठेवल्यानंतर ते बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवा आणि ड्रायफ्रुट्सने सजवा.

Dasra special Recipes
Food Recipe : 'या' सोप्या पद्धतींनी काही मिनिटांत घरीच बनवा चुरमुरे

नारळाची वडी

साहित्य

  • किसलेला नारळ

  • तूप

  • खवा

  • साखर

Dasra special Recipes
Food : उपासाच्या दिवशी उत्साही राहायचंय? 'या' पदार्थांचे करा सेवन

कृती

नारळाची वडी बनवण्यासाठी एका कढईत तूप आणि खवा मिक्स करून हलके तळून घ्या. नंतर गॅसवरून उतरवून थंड होऊ द्या. आता त्यात किसलेले खोबरे घाला. तसेच पाक बनवा. यासाठी कढई गरम करून मंद आचेवर पाणी आणि साखर शिजवा. एक उकळी आली आणि साखर विरघळली की आच वाढवा आणि घट्ट होऊ द्या. पाकाला तारा येऊ लागल्यावर गॅस बंद करा.

Dasra special Recipes
Food: झटपट तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स!

त्यात खव्याचे मिश्रण घालून चांगले मिक्स करा. लक्षात ठेवा की ही प्रक्रिया लवकर करावी जेणेकरून नारळ आणि खव्याचे मिश्रण पाकामध्ये सेट होईल. नंतर एका प्लेटमध्ये तूप टाकून खोबरे-खव्याचे मिश्रण जाडसर परतून घ्या. थंड होण्यासाठी प्लेटमध्ये ठेवा. त्यानंतर बर्फीला चाकूने हव्या त्या आकारात कापून घ्या. तुमची नारळ बर्फी तयार आहे.

Dasra special Recipes
Food : हातावर दहीसाखर ठेवण्यामागे शुभ-अशुभ नाही तर हे आहे खरं कारण

जिलेबी

साहित्य

  • १ वाटी मैदा

  • दही

  • तेल किंवा तूप

  • छिद्र असलेले कापड

Dasra special Recipes
Food Recipe : टेस्टी अन् कुरकुरीत पाणीपुरी, बनवा घरच्या घरी

कृती

मैदा आणि दही एकत्र करून घट्ट पीठ तयार करा. नंतर साधारण सहा ते सात तास पीठ तसेच ठेवा. तोपर्यंत पाक बनवा. यासाठी पाणी, साखर मिक्स करून मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा. पाक तारेतून सुटू लागल्यावर ते आचेवरून उतरवून थोडे थंड होऊ द्या. एका खोलगट कढईत तेल किंवा तूप गरम करून तयार पीठ कापडात भरा.

Dasra special Recipes
Food: सायंकाळच्या चहासोबत ट्राय करावी अशी ‘चटपटीत पंजाबी तडका मॅगी’

लक्षात घ्या छिद्र जितके लहान असेल तितकी जिलेबी पातळ होईल. हे पीठ गरम तेलात टाकून मध्यम आचेवर शिजवा. दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी रंग आला की बाहेर काढून साखरेच्या पाकात सोडा आणि नंतर बाहेर काढून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.