बॉलिवूडच्या मस्तानीला आवडणारी ईमा दातशी ही डिश आहे तरी काय?

ईमा दातशी हा पदार्थ भूतानचा राष्ट्रीय पदार्थ आहे. हा पदार्थ भातासोबत सर्व्ह केला जातो.
Deepika Padukone favourite Ema Datshi Easy recipe to make this Bhutanese delicacy
Deepika Padukone favourite Ema Datshi Easy recipe to make this Bhutanese delicacy
Updated on

सेलिब्रिटींच्या जगातील प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी अनेकजण आतुरलेलं असतात. प्रत्येक सामान्य माणुस सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. ते लोक काय खातात, त्यांच्या डायट नेमका काय, त्यांना काय आवडत, असं हर एक प्रश्न चाहत्यांना पडलेलं असतात. इतकेच नाही तर काही चाहते सेलिब्रिटींच्या अनेक गोष्टी फॉलो करतानादेखील दिसतात.

बॉलिवूडची मस्तानीबाबतीतही असेच आहे. आपल्या सौंदर्यानं सर्वांच्या मनावर राज्य करणार अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळं तिचं खासगी आयुष्य नेमकं कसं आहे, ती कोणत्या आहाराचे सेवन, तिला कोणते पदार्थ आवडतात, अशा अनेक गोष्टी जाणण्यासाठी तिचं चाहते आतुरलेलं असतात. तर आज आम्ही तुम्हाल दीपिकाच्या आवडत्या एका पदार्थाबद्दल सांगणार आहोत जे तुम्हीदेखील ट्राय करु शकता.

Deepika Padukone favourite Ema Datshi Easy recipe to make this Bhutanese delicacy
Moong Dal Toast Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मूग डाळ टोस्ट', ही आहे सोपी रेसिपी

ईमा दातशी ही डिश दीपिकाची आवडती आहे. आता हे नाव ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसलं नाही आणि ही कसली डिश. तर ईमा म्हणजे हिरवी मिरची आणि दातशी म्हणजे तुम्हाला सर्वांना आवडणार चिज. ईमा दातशी हा पदार्थ भूतानचा राष्ट्रीय पदार्थ आहे. हा पदार्थ भातासोबत सर्व्ह केला जातो. तर जाणून घेऊयात या डिशसंदर्भात.

Deepika Padukone favourite Ema Datshi Easy recipe to make this Bhutanese delicacy
Paneer Koliwada Recipe: चमचमीत कुरकुरीत खायचायं? घरीच बनवा 10 मिनिटात पनीर कोळीवाडा

साहित्य

250 ग्रॅम हिरवी मिरची

1 कांदा लांबीच्या दिशेने कापून घ्या

2 टोमॅटो

250 ग्रॅम डॅनिश फेटा चीज

6 पाकळ्या लसूण ठेचून

15 ग्रॅम धणे

30 मिली तेल

कृती

हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घ्या. त्यानंतर चिरलेला कांदा आणि चिरलेल्या मिरच्या पाण्यामध्ये धुवून घ्या. मग एका कढईमध्ये 2 चमचे तेल घाला. तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये मिरची आणि कांदा 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्या. मग टोमॅटो आणि लसूण घालून हे सर्व मिश्रण एकजीव करा.

हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये चीज घाला आणि पुन्हा 2-3 मिनिटं शिजवा. मग सजावटीसाठी त्यावर हिरवी कोथिंबीर घाला आणि भासासोबत सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.