घराच्या घरी झटपट आणि सोप्या अशा रेसिपी असतात. परंतु माहिती नसल्याने आपण ते करत नाही. भारतातील लोक सकाळी सुरुवात चहाने करतात. बहुतेक घरांमध्ये, नाश्त्यासाठी ब्रेड किंवा सँडविचसारखे पदार्थ खाल्ले जाते. तुम्ही बेसनचा, मुगाचा, रव्याचा ढोकळा बनवला असेल. आता झटपट होणारा ब्रेडचा ढोकळा बनवून बघा.
ब्रेड हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तो आठवड्यातून एकदा का होईना खाल्ला जातो. पण, ब्रेडसोबत जाम, बटरच नाश्त्याला दिले जाते. तसेच तो शिल्लक राहिला तर त्याचा उपमा बनवला जातो. तूमच्याही घरात असेच होत असेल तर ब्रेडच्या काही खास रेसिपी पाहुयात.
नाश्त्याला अनेक पारंपरिक रेसिपी केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे ढोकळा. ढोकळा ही गुजराती डिश असली तरी ती इतर राज्यातही आवडीने खाल्ली जाते. आपल्या घरातील शिल्लक राहीलेल्या ब्रेडपासूनही ढोकळा बनवला जातो. तो कसा ते पाहुयात.
ब्रेडचा ढोकळा
साहित्य
ब्रेड 5 तुकडे, दही १ कप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेले आले, हळद पावडर,हिंग,कढीपत्ता,मोहरी,चवीनुसार मीठ आणि तेल
सर्वात आधी दही घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले, हळद आणि मीठ घाला. हे तयार मिश्रण बाजूला ठेऊन द्या. आता ब्रेडचे स्लाईस घेऊन त्याचे समान चार भाग करून घ्या. गॅसवर कढई गरम करून त्यात तेल, हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करा. या फोडणीत ब्रेडचे तुकडे दह्यात बुडवून पॅनमध्ये ठेवा. दोन्ही बाजूंनी दीड ते दोन मिनिटे बेक केल्यानंतर गॅस बंद करा आणि सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.