Diwali Recipe 2023 : दिवाळीत पाहुण्यांना खाऊ घाला सॉफ्ट आणि स्पंजी गुलाबजाम; ट्राय करा ही सोपी रेसिपी

अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे.
Diwali Recipe 2023
Diwali Recipe 2023esakal
Updated on

Diwali Recipe 2023 : दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. हा सण आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आता अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे, बाजारात सर्वत्र दिवाळीची लगबग पहायला मिळत आहे.

दिवाळीनिमित्त आपण घरी सुंदर फराळ बनवतो. काही पदार्थ किंवा मिठाई आपण दुकानातून खरेदी करतो. दिवाळीमध्ये घरोघरी पाहुण्यांची रेलचेल असते. त्यामुळे, पाहुण्यांसाठी देखील खास मिठाई बनवली जाते.

दुकानातून खरेदी करण्यापेक्षा घरी स्वत:च्या हातांनी बनवलेल्या मिठाईची चव काही औरच असते नाही का? आज आपण दिवाळीत खास घरी आलेल्या पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी स्पेशल गुलाबजामची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • अर्धी वाटी मैदा

  • एक वाटी खवा (किसून घेतलेला)

  • खाण्याचा सोडा (अर्धा चमचा)

  • तळण्यासाठी तूप किंवा तेल

  • वेलची पूड किंवा पावडर (१चमचा)

  • केशर

  • दीड वाटी साखर (तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता)

  • अडीच वाटी पाणी

  • दूध

गुलाबजाम बनवण्यापूर्वी असा करा साखरेचा पाक

  • गुलाबजाम बनवण्यापूर्वी सर्वात आधी साखरेचा पाक तयार करून घ्या.

  • हा साखरेचा पाक तयार करण्यासाठी एका खोलगट कढईमध्ये किंवा खोलगट भांड्यात दीड वाटी साखर आणि अडीच वाटी पाणी घाला.

  • आता यामध्ये वेलची पावडर आणि केशर घाला.

  • आता गॅसची फ्लेम वाढवून हे मिश्रण चांगले उकळू द्या.

  • या पाकाला चांगली उकळी आल्यावर गॅस कमी करा आणि या पाकाची तार तयार होईपर्यंत हा पाक उकळवा.

  • या पाकात तार तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि हा पाक थंड झाल्यावर एका भांड्यात काढून ठेवा.

  • नंतर, तयार झालेले गुलाबजाम पाकात टाकण्यापूर्वी पाक चांगल्या प्रकारे गरम करून घ्या.

Diwali Recipe 2023
Diwali Recipe 2023 : फराळातील सर्वात पौष्टीक पदार्थ आहे कडबोळी; रेसिपी नोट करून ठेवा

गुलाबजाम बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात आधी किसलेला खवा घ्या. त्यामध्ये, अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला.

  • आता त्यामध्ये अर्धी वाटी मैदा घालून मिक्स करा. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून मळून घ्या.

  • खव्यामुळे मिश्रणाला ओलसर पणा येईल त्यामुळे, दूध घालण्याची गरज पडत नाही. परंतु, गरज पडल्यास २ चमचे दूध घालू शकता.

  • आता गुलाबजामचे पीठ मळून झाल्यावर त्याचे छान गोळे तयार करा.

  • गॅसवर कढई ठेवून त्यात तूप किंवा तेल गरम करायला ठेवा.

  • तेल किंवा तूप गरम झाल्यावर त्यात गुलाबजामचे गोळे मंद आचेवर तळून घ्या.

  • गुलाबजामचे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

  • हे गोळे नंतर थंड झाल्यावर साखरेच्य पाकात टाका. आता तुमचे स्वादिष्ट गुलाबजाम तयार आहेत.

Diwali Recipe 2023
Diwali Recipe 2023 : दिवाळीला करा बटाटा मसाला मठरी! एकदम सोपी आहे रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()