Diwali 2024: भारतात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी केली जाते. खास करून खव्यापासून बनवलेले मिठाई जास्त खरेदी केली जाते. पण तुम्हाला माहीती आहे का भेसळयुक्त खवा खाल्ल्यास आरोग्यासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. खवा जास्त दिवस टिकून राहावा यासाठी त्यात युरिन, डिटर्जेंट यासारखे हानिकारक रसायने मिक्स केले जातात. भेसळयुक्त खवा खाणे आरोग्यासाठी घातक आहे. तुम्ही घरीच भेसळयुक्त खवा कसा ओळखाल आणि त्यापासून कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया.