Diwali Recipe 2024 Chirote Recipe: दिवाळीला अवघे काही दिवस बाकी आहेत. घराघरांमध्ये साफसफाई, रंग-रंगाटी, सजावट तर फराळाची तयार सुरू आहे. हिंदू धर्मात दिवाळा हा सर्वात महत्वाचा सण आहे.
भारतात दिवाळी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा दिवाळी काही ठिकाणी १ नोव्हेंबरला तर कुठे ३१ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीत फटाके फोडणे, नवीन कपडे घालणे एवढेच नसून महिलांनी घरी बनवलेल्या स्वादिष्ट फराळांची चव चाखण्याची मज्जाच वेगळे असते.
दिवाळीचा फराळ म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी येतं. दिवाळी फराळाच्या पारंपारिक पदार्थांमध्ये चिरोटे या पदार्थाचा समावेश असतो. याआधी आपण गोड शंकरपाळी कशी बनवायची हे जाणून घेतले. आज चिरोटे कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.
तुम्हाला यंदा दिवाळीत घरच्या घरी खुसखुशीत अन् रसरशीत चिरोटे बनवायचे असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता. हा व्हिडिओ पाहून तुम्ही झटपट आणि पारंपारिक चवीचे खुसखुशीत अन् रसरशीत चिरोटे तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया खुसखुशीत अन् रसरशीत चिरोटे अनारसे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कशी आहे.