दिवाळी विशेष : रवा जिलेबी

दिवाळी विशेष : रवा जिलेबी
Updated on

कोरोना महामारीमधील दिवाळी म्हणजे एक वेगळाच विषय. कारण यावेळी मुलांच्या सुट्टीमध्ये दिवाळी अली आहे. त्यामुळे एकीकडे सगळीकडे मज्जा चालू आहे. पण आपापल्या घरामध्येच आणि कमी लोकांमध्येच सोशल  डिस्टंसिंगचे नियम पाळून दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे. यावर्षी नवीन एक गोष्ट म्हणजे बऱ्याचजणांना अजुन देखील वर्क फ्रॉम होम चालू आहे. मुलांची तर मज्जाच चालू आहे, कारण आई वडील दोघेपण एवढे महिने पहिल्यांदाच त्यांना दिसले असतील.

पण आता आयांना अजून एक काम वाढलंय, ते म्हणजे दिवाळीमध्ये मुलांच्या आवडीचे फराळाचे किंवा काहीतरी गोडधोड वेगवेगळे बनवणे. मुलांना आजकाल सारखे वेगवेगळे काहीतरी खायला लागते. रोज रोज नवीन काय बनवायचे, हा मोठा प्रश्न असतो आणि त्यात सणासुदीला तर वेगळे, कमी वेळ घेणारे गोड आणि त्यात जमेल तेवढे पौष्टीक काय बनवायचे याचे उत्तर तर शोधूनही सापडत नाही. म्हणून आज मी खास या प्रश्नाचे उत्तर घेऊन आले आहे. आज आपण पाहुयात झटपट जिलेबीची झटपट जिलेबी रेसिपी :

साहित्य :

  • १ वाटी  बारीक रवा
  • १/४ वाटी   मैदा
  • १/२ वाटी फेटलेले दही
  • १/२ टीस्पून बेकिंग पावडर
  • १/२ पिंच ऑरेंज फुड कलर
  • १ आणि १/२ वाटी  साखर
  • १/२ वाटी पाणी
  • १/२ लिंबू
  • १/२ टीस्पून विलायची पावडर
  • तळण्याकरिता तूप किंवा तेल

पद्धत : 

रवा , मैदा , ऑरेंज किंवा पिवळा रंग यामध्ये दही टाकून एकसारखे करून घ्यावे. त्यामध्ये हळू हळू पाणी घालून मिश्रण नीट भिजवून घ्यावे. मिश्रण हे अगदी घट्ट किंवा अगदी पातळ  असू नये. जिलेबीचा आकार नीट पडता येईल असे पीठाचे मिश्रण करावे. रवा छान मुरण्यासाठी हे मिश्रण अर्धा ते पाऊण तासासाठी झाकण ठेऊन भिजवायला ठेवावे. 

आता यामधील वेळेत आपण साखरेचा पाक कसा करायचा याची कृती बघुयात: 
एका पातेल्यामध्ये १-१/२  साखर घ्यायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून त्याचा एकतारी पाक करून घ्यायचा. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आणि गॅस बंद करून वेलची पावडर टाकायची. 

आता जिलेबीची कृती 

जिलेबी ही आपल्या आवडीनुसार तेल अथवा तूप यामध्ये तळावी. जिलेबीसाठी लागणारे तेल किंवा तूप हे चांगले गरम करयायचे. जिलेबीच्या पीठामध्ये सोडा टाकून सगळे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स  करायचे आणि सॉसच्या बाटलीमध्ये भरून कडक तेल/ तुपामध्ये जिलेबीच्या आकारमध्ये टाकावे. मध्य आचेवर जिलेबी छान तळून घेऊन गरम जिलेबी पाकमध्ये टाकावी. साधारणतः ५ ते १० मिनिटे पाकमध्ये जिलेबी ठेवली की पाक त्यामध्ये छान मुरतो आणि जिलेबी चविष्ट लागते. 

तर या दिवाळीमध्ये हि रेसिपी करून बघा, बाजारामधल्या जिलेब्या आपण बरेचदा खातो. पण या दिवाळीमध्ये घरी बनवलेल्या गरमा गरम जलेबीची चव तर चाखून बघायलाच पाहिजे. हॅपी दिवाळी.!

diwali festival 2020 rava jalebi recipe by kuber try today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.