Diwali Festival 2021: खुशखुशीत गोडाचे शंकरपाळे, वाचा रेसिपी

Diwali Festival 2021: खुशखुशीत गोडाचे शंकरपाळे, वाचा रेसिपी
Updated on

दिवाळी म्हटलं की फराळं असतोच. दिवाळीचा फराळं खायला कोणाला नाही आवडतं. घरात चिवडा, लाडू, चकली, करंजी आणि शंकरपाळेची तयारी सुरु झाले की समजायचे दिवाळीची तयारी सुरु झाली. फराळातील प्रत्येक पदार्थांची चव ही एकपेकाक्षा एक. फराळातील घरातील प्रत्येकाचा कोणता ना कोणता पदार्थ असतो. कोणाला चकली आवडते, कोणाला करंजी आवडते तर कोणाला शंकरपाळे. तुमच्या घरातही दिवाळीच्या फराळाची तयारी सुरु झाली असेलचं. आज आम्ही तुम्हाला खुशखुशीत गोडाचे शंकरपाळे कसे बनवायचे हे सांगणार आहोत....ट्राय करा ही रेसिपी.

गोडाचे शंकरपाळे

साहित्य :

मैदा एक किलो, पाणी दोन वाट्या, साखर अडीच वाट्या, बेकिंग पावडर दोन चमचे, मोहन तेल दोन सपाट वाट्या, चवीपुरते अर्धा चमचा मीठ.

कृती :

मैदा, बेकिंग पावडर व मीठ एकत्र चाळून घ्या. पाणी, साखर, तूप एकत्र करून गरम करा. त्यात चाळलेला मैदा घालून पोळीच्याकणकेइतपत घट्ट भिजवून ठेवा. फार घट्ट भिजवू नका. तूप थिजल्यावर गोळा फुगल्याने घट्ट व कोरडा होतो, त्यामुळे लाटायला त्रास होतो. तासाभराने पोळपाटावर जरा जाडसरपोळी लाटून त्याचे कातण्याने अथवा सुरीने चौकोनी शंकरपाळे कापून कागदावर किंवा माटात काढून ठेवा. कढईत तळण्यासाठी तूप किंवा रिफाईंड तेल घाला. तापल्यावर त्यात लाटून ठेवलेले शंकरपाळे थोड़े-थोडे घालून गोल-गोल हलवत गुलाबी रंगावर तळावे

(संदर्भ: पुस्तक-मराठी सण...मराठी रेसिपी, सकाळ प्रकाशन, लेखिका-अश्विनी अजित डिके)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.